Advertisement

एन. एम कॉलेजमध्ये मार्कशीट गोंधळ कायम

बईच्या एन. एम कॉलेजमध्ये 'बॅचलर इन अकाऊंट अँड फायनान्स' या कोर्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्कशीटच मिळाली नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आलं आहे.

एन. एम कॉलेजमध्ये मार्कशीट गोंधळ कायम
SHARES

मुंबई विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वेळापत्रक गोंधळानंतर आता विद्यार्थ्यांना मार्कशीटसाठी वणवण फिरावं लागत आहे. विलेपार्लेतील एन. एम कॉलेजमध्ये 'बॅचलर इन अकाऊंट अँड फायनान्स' या कोर्सच्या तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मार्कशीटच मिळाली नसल्याचे गंभीर प्रकरण समोर आलं आहे.


काय आहे प्रकरण?

मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या नरसी मोंजी कॉलेजमधील 'बॅचलर इन अकाऊंट अँड फायनान्स' या कोर्सच्या तिसऱ्या वर्षाच्या सेमिस्टर ५ या परीक्षेचा निकाल २१ एप्रिल २०१८ रोजी लागला. त्यानंतर मे महिन्यात मार्कशीटचं वाटपही करण्यात आलं. मात्र याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जवळपास २७ विद्यार्थ्यांची मार्कशीट जाणूनबुजून दिली जात नसल्याच दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.



का अडवली मार्कशीट?

एन. एम. कॉलेजमध्ये शिकणारे हे २७ विद्यार्थी इतर बोर्डाचे असल्यानं त्यांची मार्कशीट अडवण्यात येत असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी २०१७ ला कॉलेजमध्ये प्रवेश घेताना इतर बोर्डाची सर्व कागदपत्रं जमा केली होती. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने ही सर्व कागदपत्रं विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठवणं गरजेचं होतं. परंतु त्यांनी तसं न केल्याने या विद्यार्थ्यांची मार्कशीट थांबवण्यात आली. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाच्या या गोंधळाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


काॅलेज प्रशासनाचे हात वर

युवासेनेचे सिनेट सदस्य आणि काही विद्यार्थ्यांनी एन.एम कॉलेजचे प्राध्यापक डॉ. पराग आजगावकर यांची भेट घेत त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली. परंतु आम्हाला याबाबत काहीही माहीत नसल्याच सांगत कॉलेज प्रशासनाने याप्रकरणी हात वर केले. तसंच हा सर्व घोळ विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागानं घातल्याचा दावाही काॅलेज प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. तरी या सर्व विद्यार्थ्यांची मार्कशीट लवकरात लवकर त्यांना देण्यात यावी, अशी मागणी युवासेनेन कॉलेज प्रशासनाकडं केली आहे.


आम्ही इतर बोर्डाचे विद्यार्थी असलो तरी देखील आम्ही प्रवेश घेताना सर्व कागदपत्र देत नियमानुसार प्रक्रिया पार पाडली होती. तसंच आम्ही इतर चारही सेमिस्टर पास असल्यानं आमच पाचव्या सेमिस्टरची मार्कशीट का अडवली जात आहे, हेच आम्हाला समजत नाही. आम्हाला लवकरात लवकर मार्कशीट देण्यात यावी.
- माहेक वर्मा,विद्यार्थी, एन.एम कॉलेज



हेही वाचा-

डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया जाहीर

अकरावी प्रवेशासाठी अडीच लाख अर्ज



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा