Advertisement

पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांची कारकुनी थांबणार!


पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांची कारकुनी थांबणार!
SHARES

निवडणुकीच्या काळात किंवा पालिकेच्या कोणत्याही कारकुनी कामासाठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना नेहमीच धावपळ करावी लागते. पण महापालिकेच्या शिक्षकांची आता लवकरच इतर कामातून सुटका होणार आहे.

शाळांमध्ये प्रशासकीय कामासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमा असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी दिली आहेत. त्यामुळे शिक्षकांची आता अतिरिक्त कामातून सुटका होणार आहे.


शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर क्लेरिकल आणि मुलांच्या अॅडमिशनची कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होते. याचा परिणाम शाळेच्या निकालावर होतो. या वर्षी पालिकेच्या शाळांचा निकाल 10 टक्क्यांनी घटला आहे. पालिकेच्या शाळांच्या निकालाचा टक्का वाढावा यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यक आहे.


शुभदा गुढेकर, अध्यक्षा, शिक्षण समिती


'...तर निलंबनाला सामोरे जा'

'पालिकेच्या शाळांमध्ये मुलांची गैरसोय होत असल्याचे आढळल्यास त्या अधिकाऱ्याला निलंबनाला सामोरे जावे लागेल' अशी ताकीद शुभदा गुढेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी पी-दक्षिण विभागातील सिद्धार्थनगर शाळेला अचानक भेट दिली. तेव्हा शाळेत दुरुस्तीची काम सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना धुळीत बसावे लागत होते. शाळेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आज मुलांवर ही वेळ ओढावली. अशा वागण्यामुळेच पालक त्यांच्या मुलांना पालिकेच्या शाळेत घालण्यास इच्छुक नसतात. मात्र यापुढे आता असा प्रकार आढळल्यास संबंधित आधिकाऱ्यांना निलंबनाला सामोरे जावे लागणार आहे.




हे देखील वाचा -

शिक्षकांचा सागाच्या लाकडी खुर्ची-टेबलांचा प्रस्ताव फेटाळला

शिक्षक व्हायचंय? आता सीईटीच्या आधी द्या टीईटीची परीक्षा!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा