Advertisement

'या' विषयाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दीड तासांचा वेळ

अकरावी आणि बारावीसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाच्या २५ गुणांच्या लेखी परीक्षेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

'या' विषयाची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दीड तासांचा वेळ
SHARES

अकरावी आणि बारावीसाठी आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाच्या २५ गुणांच्या लेखी परीक्षेचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा आरखडा जाहीर केला आहे. यंदा प्रथमच हा आराखडा जाहीर झाल्यानं परीक्षेत सुसूत्रता येणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी तब्बल दीड तासांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळं यावरून टीका सुरू झाली आहे.

२५ गुणांची परीक्षा

११वी व १२वीच्या सर्व अभ्यासक्रमांना आरोग्य व शारीरिक शिक्षण विषय अनिवार्य आहे. हा विषय ५० गुणांचा असून, यात २५ गुणांची लेखी परीक्षा आणि २५ गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. प्राप्त गुणांचं अ, ब, क, ड या श्रेणीत वर्गीकरण होणार आहे.

२५ गुणांसाठी दीड तास

या परीक्षा द्वितीय सत्रात घेण्यात याव्यात, असं मंडळानं म्हटलं आहे. बहुपर्यायी प्रश्नांचा भर असलेली ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दीड तास देण्यात आला आहे. प्रत्यक्षात २५ गुणांसाठी १ तास पुरेसा असताना दीड तास देणं अयोग्य असल्याचं अनेक शिक्षकांचं मत आहे. मात्र, ऑगस्टमधील शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना २५ गुणांसाठी दीड तास, ५० गुणांसाठी अडीच तास तर ८० गुणांसाठी तीन तास देण्यात येणार आहेत. यानुसार मंडळाने हा कालावधी ठरविल्याचं समजतं. मात्र हा वेळ कमी करावा, अशी मागणी शिक्षक करत आहेत.

अशी असेल परीक्षा

आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाच्या लेखी परीक्षेत रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, पुढील विधान चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा, तक्ता पूर्ण करा हे ५ प्रश्न प्रत्येकी ४ गुणांसाठी असणार आहेत. तर थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न ५ गुणांसाठी विचारला जाणार आहे.हेही वाचा -

स्वयंचलित दरवाजावर प्रवासी नाखूश; ट्रेनमध्ये घुसमट होत असल्याची तक्रार

शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाल्याने पेढे वाटू नये- देवेंद्र फडणवीससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा