शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात


शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात
SHARES

राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी येत्या १ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार असून १७ फेब्रुवारी २०१९ रोजी ही परीक्षा होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या ५० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाते.


ऑनलाइन अर्ज येथे करा 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेसह विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षाही सोबत घेण्यात येणार आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून www.mscepune.in आणि http://puppss.mscescholarshipexam.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


अर्ज भरण्याची मुदत

१९ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत नियमित ऑनलाइन अर्ज भरता येतील. अती विलंबासह शुल्क भरण्याची मुदत १६ डिसेंबरपर्यंत असून अतिविशेष विलंब शुल्कासह १ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत दीडशे गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा, बद्धिमत्ता चाचणी यांवर भर देण्यात येणार आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकांतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचं असणार आहे.


दोन पर्याय नोंदवणं बंधनकारक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षासाठीच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या चार पर्यायंपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदवणं बंधनकारक असणार आहे. आयसीएसई आणि सीबीएसई अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही या परीक्षेस बसता येणार आहे.

संबंधित विषय