Advertisement

वैद्यकीय शिक्षण महागलं


वैद्यकीय शिक्षण महागलं
SHARES

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठल्याने आधीच सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता महाविद्यालयीन शिक्षणही महागलं आहे. गतवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांचं शिक्षण शुल्क वाढवल्यानंतर यावर्षी पुन्हा या शुल्कात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाल्याने याचा फटका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना बसणार आहे.

खासगी महाविद्यालयात राज्याच्या कोट्याचे शुल्क यंदा साधारण पाच ते 12 लाख रुपये आहे. तर व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांचे शुल्क हे साधारण 20 ते 40 लाख रुपयांच्या घरात गेले आहे. गेल्या पाच वर्षांत काही महाविद्यालयांच्या शुल्कात 40 ते 50 टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


दरवर्षी वाढतं शैक्षणिक शुल्क

मागच्या वर्षी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयीन शिक्षणाचा शुल्क वाढवूनदेखील यावर्षी पुन्हा या शुल्कात 30 टक्के वाढ केली आहे. यामुळे यंदा खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण हे पाच ते बारा लाखांच्या घरात गेले आहे, व्यवस्थापन कोट्यातील विद्यार्थ्यांचे शुल्क 20 ते 40 लाख इतके झाले आहे. 


पैसा झाला मोठा

वैद्यकीय शिक्षण शुल्कामध्ये राज्याच्या नियमित कोट्यापेक्षा व्यवस्थापन कोटयाकडून किमान चौपट शुल्क आकरण्याची परवानगी महाविद्यालयकडे आहे. त्यामुळे यंदा व्यवस्थापन कोट्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना साधारण 15 ते 48 लाख इतका शुल्क भरावा लागणार असल्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप मिटेना, पाचव्या दिवशीही सुरू

महापालिकेच्या रुग्णालयांतही मिळणार दंत उपचार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा