Advertisement

किमान वर्ष संपण्याआधी निकाल लावा! विद्यार्थी विद्यापीठाला वैतागले!


किमान वर्ष संपण्याआधी निकाल लावा! विद्यार्थी विद्यापीठाला वैतागले!
SHARES

टीवायची परिक्षा देऊन सात महिने उलटले तरी पुर्नमूल्यांकनाच्या निकालाचा पत्ताच नाहीये. विद्यापीठातील ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रियेमुळे निकालावर जो परिणाम झाला, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. वर्ष संपत आले, तरी हजारो विद्यार्थी निकालाविनाच आहेत. त्यामुळे या वर्षी तरी निकाल लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतोय.

१९ सप्टेंबरला विद्यापीठाने सर्व निकाल जाहीर केले. त्यावेळी ५० हजाराहून अधिक अर्ज हे पुर्नमूल्यांकनासाठी आले होते. मात्र, नोव्हेंबर संपत आला, तरी हजारो विद्यार्थी आजही निकालाची वाट बघत आहेत. त्यात विद्यार्थ्यांना निकाल लागला नसतानाही एटीकेटीची परिक्षा द्यावी लागली. अनेकांना उशिरा लागलेल्या निकालामुळे नोकरीच्या संधी गमवाव्या लागल्या. सतत विद्यापीठात माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांमुळे, सतत अमुक फॉर्म भरा- तमुक फॉर्म भरा यामुळे विद्यार्थी आता कंटाळले आहेत. किमान यावर्षीच निकाल लागू देत, एवढीच अपेक्षा आता विद्यार्थ्याना आहे!


विद्यापीठाकडून धड उत्तरे मिळत नाहीत..

निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यापीठाला विचारला असता, 'आम्हाला नीट उत्तरेही मिळत नाहीत. विद्यापीठाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. नेमकी आमची उत्तरपत्रिका गहाळ झाली आहे, की अद्याप तपासलीच नाहीये', असे अनेक प्रश्न डोक्यात आहेत. पण उत्तरे मात्र कोणीच देत नाही. या वर्षी तरी निकाल लागणार का? असाच प्रश्न सध्या या विद्यार्थ्यांना पडलाय. हा अनुभव केवळ एकाच विद्यार्थ्याचा नाही, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले नाहीत, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला हाच अनुभव येत आहे.


विद्यापीठाचा नवीन गोंधळ

मुंबई विद्यापीठाने आता विद्यार्थ्यांच्या अर्जांचा नवीन गोंधळ घातला आहे. 'परिक्षेला हजर होतो' अशी लेखी हमी पत्रातून विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून घेतली होती. मात्र, त्यांचे निकाल काही लावले नाहीत. 'आमचे निकाल कधी देणार? आम्ही परिक्षेला हजर होतो', असा निकालासाठी तगादा लावलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने चक्क विद्यापीठातच जमा केलेले स्वत:चे हमीपत्र शोधण्याचे काम दिले आहे. याबाबत विद्यापीठाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.


विद्यापीठावर वैयक्तिक गुन्हा दाखल करणार

यााधी आम्ही अनेक वेळा न्यायालयाची पायरी चढली आहे. मात्र न्यायालयाने दिलेले आदेशही विद्यापीठ पाळत नाही. त्यामुळे आम्ही विद्यापीठावर प्रत्येक जण गुन्हा दाखल करणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांची उतत्रपत्रिका गहाळ झाली आहे, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही विद्यापीठावर गुन्हा दाखल करण्यासाठी आवाहन करणार आहोत.

सचिन पवार, अध्यक्ष स्टुडंट्स लॉ कौन्सिल

revaliation


हेही वाचा

अभिमत शब्द वापरा, नाहीतर विद्यापीठांवर कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा