Advertisement

दहावी-बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर
SHARES

एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रक

दहावीची लेखी परीक्षा – २९ एप्रिल ते २० मे

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा – २१ मे ते १० जून

बारावीची परीक्षा – २३ एप्रिल ते २१ मे

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा – २२ मे ते १० जून

महत्त्वाचे म्हणजे ४० ते १०० गुणांच्या परीक्षेसाठी ३० मिनिटांची वेळ वाढविण्यात येणार आहे. तर ४० ते ६० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटांची वेळ वाढविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सकाळ सत्रात १०.३० वाजता तर दुपारच्या सत्रात ३ वाजता सुरू होणार आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्रप्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना

- परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहावे.

- विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचे थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.

- तापमान तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याआधी किमान ३० मिनिटे आधी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित असावे.

-  मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चे लेखन साहित्य वापरणे बंधनकारक असणार आहे.



हेही वाचा -

रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा