Advertisement

हुश्श! दहावीची पुस्तकं लवकरच मिळणार


हुश्श! दहावीची पुस्तकं लवकरच मिळणार
SHARES

अभ्यासक्रम बदलल्यानंतर पाठ्यपुस्तकं केव्हा उपलब्ध होणार, याबाबत शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता असते. इयत्ता आठवी अाणि दहावीचा अभ्यासक्रम बदलला असून नवीन रचनेनुसार अभ्यास सुलभ व्हावा, यासाठी पुस्तकं लवकरात लवकर बाजारात येणं अपेक्षित होतं. या महिन्याच्या सुरुवातीलाच दहावीची पुस्तकं भांडारात पोहोचल्याची माहिती बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी दिली अाहे. अाता मंगळवारपासून दहावीच्या पुस्तकांची विक्री सुरू होणार अाहे.


पुस्तकांच्या किंमती वाढल्या

एक पुस्तक संच खरेदी करण्यासाठी जवळपास साडेसहाशे रुपये लागणार आहेत, त्यामुळे यंदा बालभारतीच्या पाठयपुस्तकांच्या किंमती वाढल्याल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे नवीन अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध झाल्याचा आनंद असतानाच पुस्तकांच्या किमती वाढल्याने आनंदावर विरजण पडले आहे.


अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थी केंद्रित करण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी बालभारतीने दहावी पुस्तकांचे रुक्ष रूप पालटून यंदा त्यांची जागा आकर्षक रंगीत पुस्तकांनी घेतली आहे, तीसुद्धा ए-फोर आकारात. रंगीत छपाईमुळे पुस्तकांच्या किंमतीत थोडी वाढ झाली आहे.
- सुनील मगर, संचालक, बालभारती

हेही वाचा -

दहावीचा पेपर पुन्हा फुटला

दहावीच्या उत्तरपत्रिका सापडल्या रस्त्यावर! मुंबईत खळबळ!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा