Advertisement

बेसलाइन परीक्षेचा गोंधळ टळला!


बेसलाइन परीक्षेचा गोंधळ टळला!
SHARES

राज्यभरात गुरुवारी शिक्षण विभागातर्फे बेसलाईन परीक्षा घेण्यात आली. त्याचबरोबर परिपत्रकात त्याच दिवशी परीक्षा घेऊन त्याच दिवशी पेपर तपासण्याची सक्ती करण्यात आली होती. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 अशी होती. त्यानंतर एका शिक्षकाला दिवसभरात 250 ते 300 पेपर तपासणे शक्य नव्हते आणि त्यात मानवी चुका होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे शिक्षक प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

त्यानंतर आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. सुनील मगर यांच्याशी संपर्क साधून याबाबत तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला. याची दखल घेत डॉ. मगर यांनी आठवडाभरात पेपर तपासून मार्क अपलोड केले, तरी चालेल असे सांगितले. परिपत्रकाची दुरुस्ती करण्याचेही मान्य केले. त्यामुळे राज्यभरातील लाखो शिक्षकांवरचा मानसिक तणाव कमी झाला.

बऱ्याच शाळांना प्रश्नपत्रिका कमी मिळाल्या, त्यामुळे झेरॉक्स काढण्यासारख्या बाबी शाळांना स्वखर्चाने कराव्या लागल्या. राज्यभरात किती प्रश्नपत्रिकांची छपाई करण्यात आली आणि कोणत्या शाळांना कमी प्रश्नपत्रिका मिळाल्या? याची चौकशी करणे गरजेचे आहे.

जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती


बेसलाईन परीक्षा -

बेसलाईन परीक्षेमध्ये इयत्ता दुसरी ते पाचवीचे 3 पेपर आणि सहावी ते नववीचे 4 पेपर घेण्यात आले. भाषा विषयाच्या (मराठी आणि इंग्रजी) परीक्षा गुरुवारी घेण्यात आल्या. एकूण 1.60 कोटी विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. म्हणजे 24 X 32 = 5.6 कोटी एवढे पेपर एका दिवसात तपासून द्यायचे होते.



हेही वाचा -

टॅलेंट हंटच्या नावाने चालणाऱ्या परीक्षा यापुढे बंद, शिक्षण उपसंचालकांचा आदेश

घरबसल्या द्या ५ वी ते १२ ची परीक्षा, आलेय 'मुक्त विद्यालय'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा