दहावी फेरपरीक्षा निकाल जाहीर, २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

राज्य मंडळाच्या १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

SHARE

राज्य मंडळाच्या १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत झालेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या फेरपरीक्षेला २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामधील ५० हजार ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसंच, या परीक्षेत मुंबईचा निकाल १४.४८ टक्के लागला आहे. 

विद्यार्थी उत्तीर्ण

विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. तसंच, १ किंवा २ विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. मुंबईत एकूण ५३ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ७ हजार ८१२ विद्यार्थी या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार ३१ ऑगस्ट ते सोमवरा ९ सप्टेंबर पर्यंत असून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

मंडळनिहाय निकाल

पुणे - १८.१२
नागपूर - ३०.८९
औरंगाबाद - २८.२५
मुंबई - १४.४८
कोल्हापूर - १५.१७
अमरावती - २९.५३
नाशिक - २५.०८
लातूर - ३१.४९
कोकण - १५.८१हेही वाचा -

मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०२ झाडांची होणार कत्तल, महापालिकेने दिली परवानगी

सरकारी विमानसेवा कंपनी एअर इंडिया होणार प्लास्टिकमुक्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या