Advertisement

महापरीक्षा पोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी

'महापरीक्षा पोर्टल'द्वारे गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता अधिकारी, नगरपरीषद, नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज किंवा प्रवेशपत्र घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या अडचणींच्या तक्रारीसाठी विद्यार्थ्यांनी फोन किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत कोणतही उत्तर मिळत नसल्याचा दावाही काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

महापरीक्षा पोर्टल बंद करा, विद्यार्थ्यांची मागणी
SHARES

शासनाच्या विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी उपयुक्त ठरणारं 'महापरीक्षा पोर्टल' विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरायला लागलं आहे. 'महापरीक्षा पोर्टल'द्वारे स्पर्धा परीक्षांचं ढिसाळ नियोजन होत असल्याचं दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

'महापरीक्षा पोर्टल'द्वारे गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्तवार्ता अधिकारी, नगरपरीषद, नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज किंवा प्रवेशपत्र घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या अडचणींच्या तक्रारीसाठी विद्यार्थ्यांनी फोन किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत कोणतही उत्तर मिळत नसल्याचा दावाही काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

'महापरीक्षा पोर्टल' नेमक काय?

शासनाच्या विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रवेश परीक्षांच्या माहितीसाठी महापरीक्षा हे वेबपोर्टल काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलद्वारे परीक्षा विभागाची नोंदणी, परीक्षेच प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्राची निश्चित, पर्यवेक्षकांची नियुक्ती, परीक्षा घेणं, उत्तरपत्रिकांची तपासणी, त्याशिवाय निकाल जाहीर करणं या सर्व प्रक्रिया सध्या या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येतात.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी काय?

महापरीक्षा पोर्टलद्वारं विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बैठक व्यवस्था देण्यात येत असली तरी त्या बैठक व्यवस्थेप्रमाणं विद्यार्थी सामूहिक कॉपी करतात. अनेकदा परीक्षा सुरू असताना संगणक किंवा माऊस बंद पडण, अशा तांत्रिक अडचणींनाही विद्यार्थ्यांना सामोरी जाव लागतं. त्याशिवाय कधी कधी प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारण, परीक्षा विभागात पर्यवेक्षक नसणं याचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. विशेष म्हणजे विद्यार्थी अनेकदा परीक्षा संपल्यानंतरही लाॅग-इन आयडीवरून पेपर पुन्हा सोडवू शकतात.

विद्यार्थ्यांच्या या सर्व प्रश्नांसाठी प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांना निवदेन देणार असून हे पोर्टल बंद करून सरकारी परीक्षा 'एमपीएससी' पोर्टलद्वारेच घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच हे पोर्टल बंद करण्यासाठी येत्या २७ सप्टेंबरला पुण्यात तर १ ऑक्टोबरला मुंबईत प्रहार संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.
- बच्चू कडू, आमदार

हेही वाचा-

एमपीएससी घोटळ्याच्या चौकशीला गती द्या, संघर्ष समिती आक्रमक

एमपीएससीच्या टाॅप २० मध्ये एकटाच मुंबईकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा