'अजित पवार कॉलेजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'

  Borivali
  'अजित पवार कॉलेजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'
  मुंबई  -  

  बोरीवलीच्या अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द झाल्यामुळे गेल्या वर्षी अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार का? अशी चिंता या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पालकांना सतावत होती. यासंदर्भात पालकांनी शिक्षण उपसंचालकांची भेट देखील घेतली. यावेळी उपसंचालकांनी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन पालकांना दिले आहे.


  हेही वाचा

  बोरीवलीतील अजित पवार कॉलेजची मान्यता रद्द


  अकरावीत प्रवेश घेतलेल्या 485 विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ न देता त्यांना जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात येईल. येत्या 2 दिवसांत महाविद्यालयांची यादी निश्चित करण्यात येईल. त्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यावेळी म्हणाले.

  या प्रवेशाविषयी घेण्यात येणाऱ्या बैठकीदरम्यान महाविद्यालयांची यादी निश्चित केली जाईल. त्यात विद्यार्थ्यांना आपल्या जवळचे कॉलेज निवडण्याची संधी दिली जाईल.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.