Advertisement

विद्यार्थ्यांचं प्राधान्य आयटीआयलाच

दहावीनंतर केवळ दोन वर्षांचा कोर्स म्हणजे आयटीआय. हा कोर्स पूर्ण केल्यावर बहुतांश गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधीही उपलब्ध होत असल्यानं विद्यार्थी आपोआपच याकडं आकर्षित होतात. याच आकर्षणामुळे विद्यार्थी डिप्लोमा किंवा बारावी करण्यापेक्षा आयटीआयला जास्त पसंती देतात.

विद्यार्थ्यांचं प्राधान्य आयटीआयलाच
SHARES
Advertisement

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयमध्ये शिक्षण घेणं हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. रोजगाराची संधी उपलब्ध असल्यानं अनेक विद्यार्थी आयटीआयकडे आकर्षित होतात. याच आकर्षणामुळे अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक डिप्लोमाकडे पाठ फिरवून आयटीआयसाठी अर्ज करत असल्याचं समोर येत आहे.

आयटीआयलाच जास्त पसंती

दहावीनंतर केवळ दोन वर्षांचा कोर्स म्हणजे आयटीआय. हा कोर्स पूर्ण केल्यावर बहुतांश गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधीही उपलब्ध होत असल्यानं विद्यार्थी आपोआपच याकडं आकर्षित होतात. याच आकर्षणामुळे विद्यार्थी डिप्लोमा किंवा बारावी करण्यापेक्षा आयटीआयला जास्त पसंती देतात.

इतक्या विद्यार्थ्यांनी केलं अर्ज

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात पॉलिटेक्निकसाठी १ लाख ३० हजार ८०० जागा उपलब्ध असूनही त्यासाठी फक्त ५७ हजार ९९७ अर्ज आले आहेत. तर आयटीआयसाठी १ लाख ३८ हजार ३१७ जागा उपलब्ध असून या जागांसाठी जवळपास ३ लाख ९५ हजार १७४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. दरम्यान आतापर्यंत पार पडलेल्या आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेत ८० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत.

म्हणून विद्यार्थ्यांचा कल आयआयटीकडे

आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, मशिनिस्ट, डिझेल मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट यांसारखे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. तसंचं आयटीआयमध्ये पुस्तकी आणि व्यवहारिक असं दोन्ही ज्ञान मिळत असल्यानं ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थीही याला प्राधान्य देतात.

हेही वाचा - 

विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या - सोनम वांगचुक

'महा आयटीआय' अॅप लय भारी, सरकारनं घेतली दखल

संबंधित विषय
Advertisement