दालिमिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम


दालिमिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
SHARES

गोरेगाव - येथील एमटीएनएल सिग्नलवर वाहतूक पोलिसांना मदत करणाऱ्या प्रल्हाद दालमिया कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांना 45 मिनिटं आराम देऊन स्वत: वाहतूक सुरळीत केली. या वेळी त्यांनी पोलिसांना प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा यासाठी मास्कही मोफत वाटले. वाहतूक पोलिसांचं काम, त्यांना मिळणारी वागणूक याचं सर्वेक्षण करण्यासाठी कॉलेजच्या 45 विद्यार्थ्यांनी दहिसर ते अंधेरी सिग्नलवर हा उपक्रम दोन ठिकाणी आयोजित केला होता.

शुक्रवारी अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, एमटीएनएल सिग्नलवर ही मोहिम राबवली. या वेळी सिग्नल तोडू नये, चुकीचं वळण घेऊ नये, हॉर्न वाजवू नये, तसंच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं. आम्ही या उपक्रमांतर्गत माहितीही जमा करत आहोत. या माहितीचा उपयोग करून एक माहितीपटही बनवणार असल्याचं यामिनी डगे आणि उद्धव नाईक या विद्यार्थ्यांनी सांगितलं. वाहतूक पोलीस विनोद शिंदे यांनी या मोहीमेबद्दल समाधान व्यक्त केलं.

संबंधित विषय