Advertisement

धक्कादायक : विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी लघुशंकेस जाण्यास मनाई


धक्कादायक : विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी लघुशंकेस जाण्यास मनाई
SHARES

गुरूवारपासून सुरू झालेल्या लॉ च्या परिक्षांमध्ये पहिल्याच दिवशी उत्तरपत्रिकेवर नावाच्या रकान्यांमुळं झालेला गोंधळ ताजा असतानाच, सोमवारी दुसऱ्या पेपरवेऴी मालाडच्या एका लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लघुशंकेस जाण्यास मनाई केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी स्टुडंट लॉ काऊन्सिलनं विरोध दर्शवला असून कॉलेजच्या प्राचार्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणी स्टुडंट लॉ काऊन्सिलनं केली आहे.


नेमकं प्रकरणं काय?

गुरूवारी ३ जानेवारीपासून लॉ (विधी) शाखेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या एलएलबी सेमिस्टर पाचची परीक्षा सुरू झाली आहे.  या परिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना लॉ ची विविध कॉलेज देण्यात आलं असून काही विद्यार्थ्यांना मालाड पश्चिमेकडील मालाड कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेज मिळालं आहे. सोमवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत दुसरा पेपर होणार होता. या पेपरवेळी विद्यार्थ्यांना सकाळी १०.१० ला वर्गात बसण्याची सुचना देण्यात आली.

विद्यार्थी वर्गात बसल्यानंतर काही मिनिटांनंतर कॉलेजच्या प्राचार्या वंदना दुबे यांनी सर्व वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना काही सुचना दिल्या. या सुचनेत प्राचार्यांनी पेपर सुरू झाल्यानंतर पुढील तीन तास तुम्ही वर्गाबाहेर लघुशंका किंवा इतर कोणत्याही कारणात्सव जाऊ शकत नाही, अशी सक्त ताकीद दिली.


प्राचार्यांची धमकी

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विरोध करत, आम्हाला ही सुचना मान्य नाही असा पावित्रा घेतला. त्यावेळी प्राचार्या दुबे यांनी असा मुंबई विद्यापीठाचा नियम असल्याचं खोटं सांगितलं. त्यावर विद्यार्थ्यांनी याबाबत लेखी लिहून द्या असं सांगितलं असता, 'कॉलेज माझं आहे, मी नियम सांगेन ते विद्यार्थ्यांना मान्य करावे लागतील' अशी दमदाटी करून त्यांनी विद्यार्थ्यांना शांत बसवलं. विशेष म्हणजे यावेळी काही विद्यार्थिनींनी मासिक पाळी आल्याचं सांगूनही त्यांनी त्या विद्यार्थिनींनाही वॉशरूम वापरण्यास मनाई केली. या प्रकरणानंतर काही विद्यार्थिनी परीक्षा हॉलमधून अक्षरक्ष रडत घरी गेल्या. 


कारवाई करण्यात येईल

या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. अर्जुन घाटुळे त्यांनी मुंबई विद्यापीठाचा असा कोणताही नियम नसल्याचं 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं अाहे.  विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेदरम्यान विद्यार्थी लघुशंकेसाठी पर्यवेक्षकांची परवानगी घेऊन जाऊ शकतो. अशाप्रकारे विद्यापीठाचा नियम असल्याचं जर कोणी सांगत असेल तर या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येईल व संबंधितावर लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. 


मालाडच्या एमकेईससारख्या नामवंत लॉ कॉलेजमध्ये अशाप्रकारे विद्यार्थ्यांना लघुशंकेस जाण्यास मनाई करत असतील, तर ते फार धक्कादायक आहे. याबाबत विद्यापीठानं लवकरात लवकर कॉलेजच्या प्राचार्यांवर कारवाई करावी व पुढील परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना लघुशंकेस जाण्यास परवानगी द्यावी. 

 - सचिन पवार, अध्यक्ष, स्टुंडट लॉ काऊन्सिल



हेही वाचा - 

१० जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड; दिव्यांग, कलाकार, खेळाडूंना फायदा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा