Advertisement

कुलगुरूंना बडतर्फ करा!, शिक्षक संघटनांची मागणी


कुलगुरूंना बडतर्फ करा!, शिक्षक संघटनांची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. संजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राजभवनातूनही देशमुख यांच्या हकालपट्टीचे संकेत मिळू लागले आहेत.

विविध परीक्षांचे निकाल रखडल्यानंतर संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवत प्रभारी कुलगुरू आणि प्रभारी प्र कुलगुरू यांची नियुक्ती करण्यात आली. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळल्यानंतर काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाने ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर केले.

निकाल जाहीर झाल्यानंतर आता हे निकाल ज्यांच्यामुळे रखडले अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांमधून होऊ लागली आहे. रखडलेल्या निकालांप्रकरणी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागातील पथकाने चाैकशी केली असून चौकशी अहवाल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे या अहवालात दोषी ठरल्यास डाॅ. देशमुख यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच राज्याच्या मुक्त शिक्षक संघटनेनेही राज्यपालांना पत्र लिहून डाॅ. देशमुख यांना बडतर्फ करत त्यांची तसेच उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंजूर केलेल्या निविदा कंपनीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.


रखडलेल्या निकालांना ऑनलाईनचा पेपर तपासणीचा बालहट्ट धरणारे कुलगुरू डाॅ. संजय देशमुखच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची आणि उत्तरपत्रिका तपासणीसाठी नियुक्त केलेली खासगी कंपनीची चौकशी व्हायला हवी. आतापर्यंत या सर्वांची चौकशी सुरू होणे अपेक्षित आहे, परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु झालेली नाही. या सर्व प्रकारात देशमुखांचा नेमका काय हेतू होता? कशासाठी त्यांनी इतका आग्रह धरला होता? ही बाब सर्वांसमोर आलीच पाहिजे.
- सुभाष आठवले, मुक्त शिक्षक संघटनाहेही वाचा -

कुलगुरूंच्या निलंबनासाठी 'पत्र लिहा' मोहीम

मुंबई विद्यापीठावर आता पुनर्मूल्यांकनाचा भार, ५० हजार अर्जडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement