Advertisement

शिक्षकांचे पंतप्रधानांना साकडे


शिक्षकांचे पंतप्रधानांना साकडे
SHARES

देशभरातील सर्व राज्यातील अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाशी निगडित सर्व संघटनांनी त्यांच्या प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे.

या पत्राद्वारे त्यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या पंतप्रधान यांच्यासमोर मांडल्या. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सहावा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करा अशा अनेक मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा मुद्दा देखील मांडला आहे, असे शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले. 


काय आहेत मागण्या?

  • 2004 पूर्वीची पेन्शन योजना लागू करा
  • शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 65 करा
  • शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या दर्जात सुधारणा करा
  • प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्या
  • शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवा
  • शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करा
  • केंद्र आणि राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेचे नियोजन करा
  • स्वतंत्र शिक्षण आयोगाची निर्मिती करावी
  • राज्याने बजेटच्या 30 टक्के शिक्षणावर खर्च करावा



हेही वाचा - 

शिक्षकांनो घाई करा...

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा