Advertisement

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण


प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे बेमुदत उपोषण
SHARES

चर्नीरोड - 2 मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीत मान्यता देण्याऐवजी त्यांना वेठीस धरणे आणि शिक्षकांची कोणतीही चूक नसताना त्यांना सुनावणीसाठी नोटीस पाठविल्याच्या निषेधार्थ मंगळवारी बेमुदत उपोषण करण्यात आलं. चर्नीरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या आवारात हे उपोषण करण्यात आलं. कनिष्ठ महाविद्यालयातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिटचे आर. बी. पाटील, सुरेश कोकितकर, शरद गिरमकर, ईश्वर आव्हाड, विजय घोडविंदे यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी उपोषणाला बसले होते.

शिक्षकांच्या मागण्या - 

  1. विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांना त्वरीत टप्पा अनुदान द्यावे
  2. सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षण सेवक) कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांना त्वरीत सहाय्यक शिक्षक म्हणून मान्यता देण्यात यावी
  3. अल्पसंख्याक शिक्षण संस्थेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्यात याव्यात
  4. ऑनलाईन वेतन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे पगार ऑफलाईन करावेत
  5. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी त्वरीत ना हरकत प्रमाणपत्र देऊन मान्यता देण्यात याव्यात

यासह 20 प्रमुख प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं ईश्वर आव्हाड यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा