Advertisement

बोगस मतदार नोंदणीचं प्रमाण घटलं, शिक्षक, पदवीधर उमेदवार झाले अस्वस्थ

शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीचा आलेख मागील दोन नोंदणीच्या (१२ वर्षे) तुलनेत यंदा एकदम घसरला आहे. ज्या शाळांमधून वा ज्यु. काॅलेजांतून यापूर्वी ३० ते ४० टक्के मतदार नोंदणी झाली होती, ती यंदा ६ ते १० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.

बोगस मतदार नोंदणीचं प्रमाण घटलं, शिक्षक, पदवीधर उमेदवार झाले अस्वस्थ
SHARES

शिक्षक, पदवीधर मतदार नोंदणीचा आलेख मागील दोन नोंदणीच्या (१२ वर्षे) तुलनेत यंदा एकदम घसरला आहे. ज्या शाळांमधून वा ज्यु. काॅलेजांतून यापूर्वी ३० ते ४० टक्के मतदार नोंदणी झाली होती, ती यंदा ६ ते १० टक्क्यांपर्यंत घसरली आहे. प्रामुख्याने बोगस मतदार नोंदणी होऊ नये यासाठी उपाययोजना केल्याने यावर्षी नोंदणीची टक्केवारी कमी झाली. याद्वारे बोगस मतदानालाही आळा बसणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघटनेने दिली. पण दुसऱ्या बाजूला बोगस मतदारांवर वचक बसल्याने काही शिक्षक उमेदवार अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघात बनावट मतदार नोंदणी करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी भूमिका याआधीही मुख्याध्यापक संघटनेने मांडली होती. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून वास्तव समोर ठेवण्यात आलं होतं.


नोंदणी वाढवण्याचा प्रयत्न

मुख्याध्यापक संघटनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने सध्या जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार नोंदणी वाढवण्यासाठी घाम गाळावा लागतो आहे, अशी माहिती मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.


मुख्याध्यापकांनी दबावाला बळी पडू नये

शिक्षण क्षेत्रात कोणीही गलिच्छ राजकारण करू नये. मुख्याध्यापकांवर दबाव आणून, चुकीचा पत्ता देऊन जबरदस्तीने मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. भविष्यात अडचण निर्माण झाल्यास कुणीही मदतीला येत नाही. त्यामुळे अधिकृत नोंदणी करण्याचं आवाहनही रेडीज यांनी यावेळी केलं.


शिक्षक त्रस्त, म्हणून नोंदणी नाही

दररोजच्या कामाचा भार, ऑनलाईन कामे, नोकरीची शाश्वती नाही, नो पेन्शन, नो पगार या कारणामुळे शिक्षक वैतागले आहेत. सगळ्यात जास्त आंदोलनं ही शिक्षण क्षेत्रात होतात. ती का होतात? याचा राजकीय पक्षांनी आणि जिल्हाधिकारी यांनी विचार करावा. प्रश्न जर शिक्षक-शिक्षकेतरांनीच सोडवायचे असतील तर अधिकारी हवेच कशाला? त्यामुळे आज शिक्षक मतदार नोंदणीकडे पाठ फिरवत असल्याचं मुख्याध्यापक संघटनेने म्हटलं आहे. सोबतच मतदार नोंदणीसाठी बळाचा वापर करू नका अन्यथा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.हेही वाचा-

पदवीधर मतदार नोंदणी केलीत का? नसेल तर हे वाचा!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा