Advertisement

शिक्षकांना मंत्रालय प्रवेशबंदी? विनोद तावडेंची मात्र सारवासारव

'शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश देऊ नये', असे थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आदेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून त्यांनी याचा निषेध केला आहे.

शिक्षकांना मंत्रालय प्रवेशबंदी? विनोद तावडेंची मात्र सारवासारव
SHARES

राज्यातील नागरिक आपल्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने मंत्रालयात येत असतात. त्यामध्ये शिक्षकांचाही समावेश असतो. मात्र, 'शिक्षकांना मंत्रालयात प्रवेश देऊ नये', असे थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आदेश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष पसरला असून त्यांनी याचा निषेध केला आहे.


शिक्षकांची अवस्था शेतकऱ्यांसारखी...

शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी त्यांच्या मंत्रालयीन प्रवेशाच्या झालेल्या अडवणुकीसंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षण विभाग आणि पोलीस नियंत्रण कक्ष यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. शिक्षकांची अवस्था ही शेतकऱ्यांसारखी झाली असून आपल्या अनेक प्रश्नांसाठी त्यांना मंत्रालयाचे खेटे मारावे लागतात. अशावेळी त्यांना केवळ शिक्षक म्हणून अडवले जाते हा त्यांचा अपमान असल्याचे मत जनादर्न जंगले यांनी व्यक्त केले.

शिक्षकांना मंत्रालयीन प्रवेश नाकारणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देणे शिक्षण विभागाचे काम आहे. त्यांना अडवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला जात आहे.

जनार्दन जंगले, अध्यक्ष, शिक्षक लोकशाही आघाडी

मंत्रालयीन प्रवेशाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करत प्रवेशाच्या वेळी केवळ शिक्षक म्हणून जंगले याची अडवणूक झाली. त्यानंतर त्यांनी गेटवर उपस्थित पोलिस उपनिरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांशी तब्ब्ल २ तास प्रवेशासाठी चर्चा केली. मात्र, त्यानंतर त्याच पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना यासंबंधी तक्रार करण्याचेही सुचविले, असे जंगले यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी जंगले यांनी मुख्यमंत्री कार्यलयात व शिक्षण विभागात भेटून पत्रही दिले. मात्र त्यांना अधिकाऱ्यांना भेटू दिले नाही.


शिक्षकांना मंत्रालयात कोणत्याही प्रकारची प्रवेश बंदी करण्यात आलेली नाही. परंतु, काहीजण आपल्या प्रश्नांसाठी मंत्रालयात आत्महत्येची धमकी देऊन मंत्रालयीन व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारची सूचना मंत्रालयीन सुरक्षा कार्यालयाकडून मिळाल्यानंतर अशा ठराविक व्यक्तिंना प्रवेश देताना पोलिस यंत्रणा दक्षता घेते, त्याचाशी शिक्षण खात्याचा संबंध नाही.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री


दिशाभूल करणारा दावा - तावडे

विशेष म्हणजे जंगले यांचे पत्र कार्यलयात पोहोचताच यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले. मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्था हा विषय पूर्णपणे पोलिसांशी संबंधित आहे. कोणत्या व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश द्यावेत वा देऊ नयेत, या संदर्भात शिक्षणमंत्री म्हणून आपण कोणतेही लेखी अथवा तोंडी आदेश पोलिस यंत्रणेला दिलेले नाहीत. तसेच, कोणत्याही शिक्षकाला मंत्रालयात प्रवेश देऊ नयेत, अशा सूचनाही कोणत्याही यंत्रणेला दिलेल्या नाहीत. अनेक शिक्षकांनी आणि शिक्षक संघटनांच्या प्रतिनीधींनी त्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजही आपली मंत्रालयात भेट घेतली. त्यामुळे मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तर्फे करण्यात आलेला दावा हा पूर्णपणे खोटा, चुकीचा व दिशाभूल करणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

अन् अामिर खान मंत्रालयात येतो तेव्हा...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा