Advertisement

शिक्षकांना लवकरच अशैक्षणिक कामांतून करणार मुक्त- वर्षा गायकवाड

शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची अतिरिक्त कामं (Extra work) टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री (School Education Minister) वर्षां गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली.

शिक्षकांना लवकरच अशैक्षणिक कामांतून करणार मुक्त- वर्षा गायकवाड
SHARES

राज्यातील शिक्षकांना (State Teachers) अशैक्षणिक कामांत गुंतवल्यानं विद्यार्थ्यांच्या (Students) शैक्षणिक प्रगतीत बाधा पोहोचत आहे. तसंच, शिक्षक (Teachers) व मुख्याध्यापक (Headmaster) यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही आहे. मात्र, अस असताना या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा करण्यात केली जाते. त्यामुळे शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची अतिरिक्त कामं (Extra work) टप्प्याटप्प्यानं बंद करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री (School Education Minister) वर्षां गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली.

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या (Brihanmumbai Secondary and Higher Secondary School Headmaster Association) अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलं. रविवारी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच, या सोहळ्यादरम्यान वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

हेही वाचा - 'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित

या सोहळ्यावेळी वर्षा गायकवाड यांनी 'मी शालेय शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारून १५ दिवसच झाले आहे. मात्र, शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत. आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना २५० अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून ते जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे', असं म्हटलं.

हेही वाचा - पाॅलिटिकल किडेगिरी, शिवरायांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदींचा चेहरा

'अध्यापनाव्यतिरिक्त करावी लागणारी कामं बंद करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणं विनाअनुदानित शाळांबाबत (Unsigned School) अर्थमंत्र्यांशी (Minister of Finance) चर्चा सुरू असून, तो प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. मी स्वत: शिक्षिका असल्यानं मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. शिक्षकांनी आपले प्रश्न इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चर्चेनं सोडवावेत', असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.



हेही वाचा -

सचिन तेंडुलकर होणार ऑस्ट्रेलियाचा कोच

वांद्रे किल्ल्याची दुरवस्था, पालिका करणार सुशोभीकरण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा