शारदाश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी तंत्रविषयक कार्यशाळा

येत्या रविवारी विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दादरच्या शारदाश्रम शाळेत तंत्रविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

SHARE

आपल्या आजूबाजूला विविध विषयांवर कार्यक्रम होत असतात. काही सामाजिक असतात, काही राजकीय तर काही सांस्कृतिक. यानुसार येत्या रविवारी विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दादरच्या शारदाश्रम शाळेत तंत्रविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 


प्रात्यक्षिक करण्याची संधी

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वायरींग, वेल्डिंग, कारपेंटरी, फिटींग, तसेच लेथ मशीन यांसारख्या विविध मशीन पाहता येणार असून ही सर्व कामे त्यांना स्वत:ही करून पाहता येणार आहेत. तसंच या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिक करुन पाहण्याची संधीही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यशाळेत तज्ज्ञ शिक्षकही सहभागी होणार असून त्यांचंही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही मिळणार आहे. 

या कार्यशाळेत विद्यार्थी व पालक या दोघांना सहभागी होता येणार असून ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत असणार आहे. याा कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी मेधा पाटील (९३२३६१६८६१), सचिन काळे (८१०८३७२६२६) किंवा हर्षदा मिश्रा (९४२२५७०७७७) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन संस्थेनं केलं आहेहेही वाचा -

पाचवी आणि आठवीची परीक्षा पुन्हा सुरू

शिक्षकांची निवडणूक कामातून सुटकासंबंधित विषय