मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून मंगळवारी १९ जून रोजी पहिली मेरीट लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी व फी भरण्यासाठी २० जून ते २२ जून ही तारीख देण्यात आली असून दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणेच जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ जूनपासून मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी आतापर्यंत एकूण २ लाख ७५ हजार ३९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ५४ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेतील परंपरागत आणि सेल्फ फायनान्सिंग अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले अाहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी अर्ज अाले आहेत.
अ.क्र. अभ्यासक्रमाचे नाव प्रवेश अर्जांची संख्या
१ बीए ५५६६२
२ बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स) ८०७८८
३ बीकॉम (बँकिंग अँड इन्श्युरन्स) २७८००
४ बीकॉम (फायनान्शिअल मार्केट) १६६३५
५ बीकॉम २४९२५४
६ बीएमएम ५६५९१
८ बीएस्सी (एव्हीएशन) १८४७
९ बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स) २५८७
१० बीएस्सी (होम सायन्स) १०७५
११ बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी) ४४८९
१२ बीएस्सी (आयटी) ६८४४८
१३ बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी) २१२८५
१४ बीएस्सी (कम्प्युटर सायन्स) ३४२७९
१५ बीएस्सी ७१३३०
१६ बीव्होक २८२६
हेही वाचा -
शिक्षकांना मिळणार इंग्रजीचे धडे
खासगी शाळांना मिळणारी वीज सवलत रद्द