Advertisement

शिक्षकांना मिळणार इंग्रजीचे धडे

तेजस प्रकल्पातंर्गत राज्यातील ४० हजार शिक्षकांना इंग्रजीचं प्रशिक्षण दिलं जाणार असून त्याचा फायदा जवळपास २५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार आहे.

शिक्षकांना मिळणार इंग्रजीचे धडे
SHARES

राज्यातील अनेक शिक्षकांचं इंग्रजी कच्चं अाहे. काही शिक्षकांना तर इंग्रजी शब्दांचे उच्चारही नीट येत नाहीत. त्याचा परिणाम मात्र विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळं अाता शिक्षकांना इंग्रजी बोलता यावं, त्यांचा इंग्रजी भाषेचा दर्जा सुधारावा यासाठी ब्रिटीश काऊन्सिलनं पुढाकार घेतला आहे. तेजस प्रकल्पातंर्गत राज्यातील ४० हजार शिक्षकांना इंग्रजीचं प्रशिक्षण दिलं जाणार असून त्याचा फायदा जवळपास २५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार आहे. याशिवाय राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना २०२१ पर्यंत इंग्रजीमध्ये निष्णात बनवण्यात येईल, अशी योजनाही आखण्यात येणार आहे.



खास प्रशिक्षकांची नियुक्ती

सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याकरिता किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीचं ज्ञान असणं गरजेचं झालं आहे.  एखाद्या विद्यार्थ्याला केवळ उत्तम इंग्रजी येत नाही यासाठी नाकारलं जाऊ नये यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं इंग्रजी शिकविण्यासाठी खास प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली अाहे.  त्यांच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येईल व ते शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करतील. तसंच महिला सक्षमीकरणासाठी देशातील १०० तरुणींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १०० तरुणींचा समावेश  आहे.



ब्रिटिश काऊन्सिलशी करार

भारत व इंग्लंडचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश काउन्सिलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ज्ञान अधिक समृद्ध करणं महत्त्वाचं आहे. यासाठी काऊन्सिल विविध योजना राबवणार अाहे. ब्रिटिश काऊन्सिलनं राज्य सरकारसोबत सामंजस्य करार करून, इंग्रजी प्रशिक्षणामध्ये सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे.  या अंतर्गत सरकारी शाळांमधील शिक्षकांना निवडण्यात येईल व टीचर्स अ‍ॅक्टिव्हिटी ग्रुप, वर्कशॉपच्या माध्यमातून व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल आणि त्यांना प्रशिक्षित करण्यात येईल.



हेही वाचा -

खासगी शाळांना मिळणारी वीज सवलत रद्द

वैद्यकीय शिक्षण महागलं

एमफिल, पीएचडी प्रवेश परीक्षा द्या ऑनलाईन



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा