हाॅलतिकीटाविनाच विद्यार्थी बसले परीक्षेला...


SHARE

तुमची परीक्षा उद्यापासून सुरू होतेय आणि तुमच्या हाती हाॅलतिकीटचं नसेल, तर काय कराल?? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराकडं पाहता सगळचं शक्य आहे. गुरूवारी टीवायच्या विद्यार्थ्यांची एटीकेटीची परीक्षा सुरू झाली. पण परीक्षा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या हाती हाॅलतिकीटच नव्हतं, त्यामुळं सगळ्याच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. हाॅलतिकीट मिळवताना परीक्षेच्या टेन्शनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना नाहक धावपळ करावी लागली. अखेर अटीतटीच्या क्षणी वेळ मारून नेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आलेले परीक्षेचे अलर्ट पाहून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं.  

हॉलतिकिटाचे काम पाहणाऱ्या कंपनीनेच विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून दिलं नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे यावेळी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मिळाली. पण तोपर्यंत एकाही विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न दिल्यानं विद्यार्थ्यांचा जीव चांगलाच भांड्यात पडला. अखेर काॅलेजकडील विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या मोबाईलवर आलेले पेपरचे अलर्ट पाहून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं.  

उर्वरीत सर्व विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट उपलब्ध करून दिल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं. 


विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा असल्याचे कळवण्यात आले. मात्र हॉलतिकीटच मिळालं नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अशा बेजबाबदार व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी, मुलांना अभ्यास सोडून हॉलतिकिटासाठी भटकावं लागलं.
- महादेव जगताप, माजी सिनेट सदस्य


हेही वाचा - 

विद्यापीठातला हेल्पडेस्क विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीच!

सरासरी गुणांचा विचार नाहीच - मुंबई विद्यापीठडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय