Advertisement

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यंदाही होणार


शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यंदाही होणार
SHARES

यंदाही शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. त्यानुसार शाळेच्या १ ते ३ किलोमीटर परिसरातील सर्वेक्षण राबवण्याची सूचना शिक्षण निरीक्षकांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना केली आहे. या शाळाबाह्य मुलांचा शोध ३१ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.


दर्जेदार शिक्षण अनिवार्य

शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदवले जाणे, नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणं अनिवार्य आहे. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत गेल्या काही वर्षांपासून शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे.


त्यांची शाळांमध्ये नोंदणी करा

यंदाही शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली असून त्यांनी शाळेच्या १ ते ३ किलोमीटर परिसरातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांची शाळांमध्ये नोंदणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण निरीक्षकांनी शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या शाळाबाह्य मुलांचा अहवाल शासनाला कळवणे अनिवार्य आहे.


हेही वाचा -

पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement