कॉलेजच्या ‘चुकीची’ शिक्षा स्वातीला

  Mumbai
  कॉलेजच्या ‘चुकीची’ शिक्षा स्वातीला
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठ आणि सिद्धार्थ महाविद्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावाची शिक्षा एका विद्यार्थिनीला भोगावी लागत आहे. परीक्षा देऊन गेले दोन वर्ष झाले तरी सिद्धार्थ महाविद्यालयातल्या एलएलबीच्या विद्यार्थिनीला मुंबई विद्यापिठाने गुणपत्रिकाच दिली नसल्याची बाब समोर आली आहे. 

  स्वाती बागडे असे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तिने सन 2015 मध्ये सिद्दार्थ कॉलेजमधून एलएलबीची परीक्षा दिली होती. मात्र कॉलजने स्वाती बागडेचे प्रॅक्टिकलचे गुण विद्यापिठाकडे वेळेवर न दिल्याने दोन वर्ष झाले तरी तिला एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची गुणपत्रिका अद्याप मिळालेली नाही. यात स्वातीबरोबर आणखी असे 4 विद्यार्थी होते. विद्यापिठाने गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2016 मध्ये एक बैठक घेतली. त्यानंतर 4 विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या पण स्वातीला अद्याप न्याय मिळालेला नाही. स्वातीने याविषयी ‘विद्यार्थी तक्रार निवारण कक्षात’ तक्रार केली. या तक्रारीनंतर ‘विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाने’ स्वातीच्या बाजूने निर्णय दिला. यात पूर्णत: कॉलेजची चूक असल्याचे त्यांनी सांगितले.

  मी गेले दोन वर्ष घरीच आहे. गुणपत्रिका न मिळाल्यामुळे मला कुठेही नोकरी मिळत नाही. माझ्या परिक्षेचा निकाल 23 जूलै 2015 ला लागला, मी नापास झाल्याचे माझ्या निकालात दाखवण्यात आले. त्याचे कारण गुणपत्रिकेत मी प्रॅक्टीकल परिक्षेला गैरहजर होते असे दाखवण्यात आले. त्यानंतर मी लगेचच याविषयी कॉलेजकडे तक्रार केली

  स्वाती बागडे, विद्यार्थिनी

  अखेर न्याय मिळविण्यासाठी स्वातीने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. उच्च न्यायालयाने 8 मार्च 2017 रोजी निर्णय जाहीर केला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार यात कॉलेजचीच पूर्णत: चूक आहे. कॉलेजने 15 हजार रुपये दंड भरावा आणि स्वातीचा लवकरात लवकर निकाल जाहीर करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने सिद्धार्थ कॉलेजला दिला. त्यानंतर 29 मार्चला सिद्दार्थ कॉलेजने दंडाची रक्कम भरली. मात्र न्याययालयाच्या निर्णयानंतरही कॉलेजने स्वातीच्या प्रॅक्टिकलचे गुण विद्यापिठाकडे न दिल्यामुळे  विद्यापिठाने स्वातीची गुणपत्रिका देण्यास नकार दिला आहे. या सर्व घोळात स्वातीची 2 महत्वाची वर्षे वाया गेली आहेत.

  या प्रकरणात पुर्णत: कॉलेजचीच चूक आहे. कॉलजने विद्यापिठाकडे वेळेत प्रॅक्टिकलचे गुण पाठवले असते तर विद्यापिठाने तात्काळ गुणपत्रिका दिली असती.

  एम. ए. खान, निबंधक, मुंबई विद्यापीठ 

  या एकूण प्रकाराबाबत 'मुंबइ लाइव्ह' ने सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य सुधाकर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.