विकासात्मक अक्षमता असलेल्या मुलांसाठी मुंबईत नवे केंद्र

 BMC office building

See all

परळ - ग्लोबल हॉस्पिटलच्या ट्रस्ट हाऊसमध्ये सिप्ला फाऊंडेशनच्या सहकार्याने 'उम्मीद चाईल्ड डेव्हलपमेंट अॅण्ड डिसेबिलीटी या नव्या सेंटरचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. उम्मीद चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. विभा कृष्णमूर्ती यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. विकासात्मक अक्षमता असलेल्या मुलांना वैद्यकीय सेवांबरोबरच प्रशिक्षण सुविधा पुरवण्याच्या हेतूने हे केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये स्वमग्नता, सेलेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, अटेंशन डिफिशट हायपर अक्टिव्हिटी डिसऑर्डर, वागणूक आणि भावनात्मक अडचणी असलेल्या मुलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल.

भारतात लहान वयातील अपंगत्व ही गुंतागुंतीची समस्या आहे. भारतात 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार 19 वर्षांखाली 78 लाख 62 हजार 921 मुलांना अपंगत्व असून, त्यापैकी 59 लाख 5 हजार 89 मुलांना बौद्धीक अपंगत्वाची समस्या आहे. विकासात्मक अपंगत्व असलेल्या लोकांना आयुष्यातील महत्त्वाची कौशल्ये वापरताना अडचणी येतात. (उदा. भाषा, हालचाल, शिकणे, स्व-मदत, स्वतंत्रपणे राहाणे इत्यादी) त्याच्या सोयीसाठी उम्मीदने सुरू केलेले नवे केंद्र परळमध्ये तीन हजार चौरस फुटांत वसलेले असून, ते विकासात्मक अपंगत्वाविषयी संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. केंद्राद्वारे पालकांनाही अपंगत्वाविषयी, त्यांच्या मुलांच्या काळजीविषयी तसेच भविष्यातील त्यांच्या विकासाबद्दल प्रशिक्षित केले जाईल.

Loading Comments