Advertisement

'एलएलएम' प्रवेश परीक्षा लांबणीवर


'एलएलएम' प्रवेश परीक्षा लांबणीवर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या एलएलबी आणि एलएलएम प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेशपरीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अनेक दिवसांपासून याविषयी वाद सुरू होता. त्यामुळे लवकरात लवकर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. दरम्यान विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाली असून येत्या १५ जून २०१८ रोजी होणारी एलएलएम परीक्षा आता १३ जुलै रोजी होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाने अधिकृत ट्विटद्वारे सोमवारी ही घोषणा केली.


यामुळे विद्यार्थी गोंधळात

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठाने लॉ शाखेच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करत विविध परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. विद्यापीठाच्या सातत्याने बदलत असलेल्या या वेळापत्रक गोंधळामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी यावर नाराजीही व्यक्त केली होती.

लॉ शाखेच्या एलएलबी आणि एलएलएम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेतील शेवटच्या 'लॉ रिलेटिंग टू वुमन अँड चिल्ड्रन' या विषयाची परीक्षा एलएलएमच्या प्रवेशपरीक्षेच्या दिवशीच येत असल्याने अनेकांनी याला आक्षेप घेतला होता.


विद्यार्थ्यांची मागणी मान्य

'लॉ'च्या शेवटच्या वर्षीच्या ज्या विद्यार्थ्यांना ही प्रवेशपरीक्षा द्यायची आहे, त्यांची यामुळे अडचण होणार होती. त्याशिवाय या परीक्षेची वेळ जरी वेगळी असली तरी विद्यार्थ्यांना यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार होता. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांमार्फत वारंवार करण्यात येत होती. अखेर विद्यार्थी संघटनांमार्फत केलेल्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली असून एलएलएम प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा -

'लॉ' शाखेचे आणखी दोन निकाल जाहीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा