Advertisement

लॉ च्या परीक्षेत २५ गुणांचे प्रश्न चुकीचे


लॉ च्या परीक्षेत २५ गुणांचे प्रश्न चुकीचे
SHARES

मागील गुरूवारपासून सुरू झालेल्या लॉच्या परीक्षांमधील गोंधळ काही थांबत नाही. या गोंधळात आणखीन भर पडली आहे. सोमवारी लॉ च्या पेपरमध्ये तब्बल २५ गुणांचे प्रश्न चुकीचे विचारण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे परीक्षा संपायच्या अर्धा तास आधी चुकांची दुरुस्ती करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला. 


नेमकं प्रकरण काय?

गुरूवारी ३ जानेवारीपासून लॉ (विधी) शाखेच्या तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या एल.एल.बी सेमिस्टर पाचची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेतील मालमत्ता हस्तांतरण कायदा या विषयाचा पेपर सोमवारी होता. या पेपरवेळी मराठी प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रश्नातील दोन गुणांचा दुसरा आणि दुसऱ्या प्रश्नातील पाच गुणांचा दुसरा प्रश्न हे दोन्ही प्रश्न चुकीचे देण्यात आले होते. तर तिसऱ्या प्रश्नातील तिसरा प्रश्न अर्धवट, चौथ्या प्रश्नातील १२ गुणांचा सहावा प्रश्न हा अन्य विषयातील देण्यात आला होता. हे चारही प्रश्न तबबल २५ गुणांचे होते. याबाबत विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता अद्याप विद्यापिठाकडून याबाबत कोणतीही सूचना न आल्याचं सांगण्यात आलं

 विद्यार्थ्यांची तारांबळ

त्यानंतर  पेपर संपण्याच्या अर्धा तास आधी प्रश्न चुकीचे, अर्धवट आणि अन्य पेपरमधील असल्याचं विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं. ऐनवेळी विद्यार्थ्यांना प्रश्न चुकीचे सांगण्यात आल्यानं त्यांची तारांबळ उडाली. अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे प्रश्न सोडून दिले होते. तर अन्य विषयातील १२ गुणांचा प्रश्न बहुतेक विद्यार्थ्यांनी लिहिला होता. परंतु शेवटचा अर्धा तास शिल्लक असताना दुरुस्ती करण्यात आल्यानं आणि विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यास फारसा वेळ न मिळाल्यानं त्यांचा गोंधळ उडाला


मार्क द्यावेत

पेपरमधल्या चुकीच्या प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी चुकीच्या प्रश्नांचे मार्क विद्यार्थ्यांना देण्यात यावेत, तसंच अशा प्रकारची चुक पुन्हा होऊ नये यासाठी विद्यापीठानं दक्षता घ्यावी, अशी मागणी स्टुडंट लॉ काऊन्सिलनं केली आहे.


प्रश्न चुकीचे असल्याचं कळताच विद्यापीठाकडून कॉलेजांना याबाबत कळवण्यात आलं होते. कॉलेजातील शिक्षकांनी काही तासांतच विद्यार्थ्यांना याची माहिती देण्यात अाली. विद्यार्थ्यांना तातडीनं प्रश्न बदलून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचं नुकसान होणार नाही याची दखल विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात येईल.

- विनोद माळाळे, जनसंपर्क अधिकारी, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा -

१० जानेवारीपासून राज्यात ओपन एसएससी बोर्ड; दिव्यांग, कलाकार, खेळाडूंना फायदा

धक्कादायक : विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी लघुशंकेस जाण्यास मनाई




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा