Advertisement

युवा गणितज्ज्ञांनी युसिमस स्पर्धेत दाखवली जादू

युसिमस राज्यस्तरीय लिसनिंग स्पर्धेतील स्पर्धकांना ६ सेकंदात प्रश्न एेकून त्यांची उत्तरे द्यायची होती. तसंच फ्लॅश स्पर्धेत विद्यार्थ्यांना बोर्डवर दिसणाऱ्या दृश्याच्या आधारे एक सेकंदाच्या आत उत्तरे द्यायची होती. त्याशिवाय कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने वेगवेगळ्या मूल्यांमध्ये दोन अंकी संख्यांच्या एका डझन पंक्तींची (रो ऑफ डझन) गणना करायची होती.

युवा गणितज्ज्ञांनी युसिमस स्पर्धेत दाखवली जादू
SHARES

युनिव्हर्सल कन्सेप्ट मेंटल अरिथमेटिक सिस्टम (युसिमस) साठी काम करणाऱ्या सीबीएस एज्युकेशन संस्थेने सोमवारी २३ एप्रिलला युसिमस राज्यस्तरीय लिसनिंग (श्रवण) आणि फ्लॅश स्पर्धेचं मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये आयोजन केलं होतं.

कुणाचा सहभाग?

या स्पर्धेमध्ये मुंबई, ठाणे रायगड, नाशिक, धुळे इ. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यातील ९०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ६ ते १३ वयोगटातील मुलांनी संगणक तसंच कॅल्क्युलेटरपेक्षाही जलदगतीने गणिताची कोड्यांची उकल करून आपल्या गणितीय कौशल्याचं प्रदर्शन केलं.

कशी होती स्पर्धा?

युसिमस राज्यस्तरीय लिसनिंग स्पर्धेतील स्पर्धकांना ६ सेकंदात प्रश्न एेकून त्यांची उत्तरे द्यायची होती. तसंच फ्लॅश स्पर्धेत विद्यार्थ्यांना बोर्डवर दिसणाऱ्या दृश्याच्या आधारे एक सेकंदाच्या आत उत्तरे द्यायची होती. त्याशिवाय कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने वेगवेगळ्या मूल्यांमध्ये दोन अंकी संख्यांच्या एका डझन पंक्तींची (रो ऑफ डझन) गणना करायची होती.

या सर्व स्पर्धेत स्पर्धकांनी क्ल्क्युलेटरपेक्षाही जलदगतीने उत्तरे दिली असून त्यात श्रेया चौहान(११ वर्ष) या मुलीने ४ अंकी आणि १० पंक्तींची गणना करुन 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स'ची ट्रॉफी पटकावली.

आम्ही आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून केवळ मुलांमध्येच नव्हे, तर त्यांच्या आई-वडीलांमध्येही हा उत्साह दिसला. अबॅकस आणि मानसिक अंकगणित कौशल्य तसंच त्यांची श्रवणक्षमता आणि दृश्य क्षमता वाढविण्याकरिता मुलांसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.
- संजय भोईर, संचालक, सीबीएस एज्यूकेशन प्रा. लि.

हेही वाचा-

दादरमधली 'शारदाश्रम' आता इतिहासजमा होणार!

व्यायाम करा आणि मार्क्स मिळवा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा