दृष्टीहीनांचा डोळे दीपवणारा कलाविष्कार

  मुंबई  -  

  विलेपार्ले - आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असेल तर काही अशक्य नाही, हे दाखवून दिलंय 19 दृष्टीहीन तरुणांनी. कसदार अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव, यांचा कलाविष्कार पाहून तुम्हीही थक्क व्हाल. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या 19 दृष्टीहीन तरुणांनी महाकवी कालिदासच्या मेघदूताची सफर घडवली. विलेपार्लेतल्या दिनानाथ नाट्यगृहात सोमवारी 'अपूर्व मेघदूत' हा नाट्यप्रयोग झाला.

  नाटकाचे लेखन, अनुवाद आणि गीतरचना गणेश दिघे यांनी केलीय. तर नाटकाच्या निर्मात्या रश्मी पांढरे आणि वीणा ढोले आहेत. हे नाटक पाहण्यासाठी मराठी कलाकार सुमित राघवन आणि विजय पाटकर यांनी हजेरी लावली. दृष्टीहीन व्यक्तींकडे विलक्षण प्रतिभा असते, हे या तरूणांनी यावेळी सिद्ध केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.