Advertisement

हॅपी बर्थ डे सिद्धार्थ जाधव!


हॅपी बर्थ डे सिद्धार्थ जाधव!
SHARES

तुम्ही दिसायला स्मार्ट असाल, रंगाने गोरे असाल, तरच तुम्ही सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करू शकता, या गोष्टीला खोटं पाडून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता 'सिद्धार्थ जाधव' याचा आज ३६ वा वाढदिवस.

२३ ऑक्टोबर १९८१ साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने पुढच्या शिक्षणासाठी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथूनच त्याचा एकांकिकांमध्ये काम करण्याचा प्रवास सुरु झाला. 'तुमचा मुलगा करतो काय' हे सिद्धार्थचं पाहिलं नाटक. या नाटकामधून तो प्रकाशझोतात आला.

अगं बाई अरेच्या, जत्रा, माझा नवरा तुझी बायको अशा बऱ्याच सिनेमांमध्ये सिद्धार्थ जाधव दिसला आणि आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनावर त्याने छाप पडायला सुरुवात केली. सिद्धार्थने प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळी भूमिका बजावत आपल्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.'जत्रा' सिनेमात साकारलेला सिद्धू असो, 'खो-खो' सिनेमातून आदिमानवाचं काम असो, 'मी शिवाजी राजे भोसले' सिनेमातील उस्मान पारकर असो किंवा मग 'मध्यमवर्गीय' सिनेमातील इन्स्पेक्टरची भूमिका असो. सिद्धार्थने त्याच्यातल्या वैविध्यपूर्ण नटाला कायमच सिद्ध केलं आहे. 'हुप्पा हुय्या' सिनेमात हनम्याचं पात्र करणाऱ्या सिद्धार्थने चांगलीच शरीरयष्टी कमावली. प्रेक्षकांनाही सिद्धार्थमधील बदल आवडला.फक्त मराठीच नाही, तर हिंदी सिनेसृष्टीतही सिद्धार्थने स्वतःची जागा निर्माण केली आहे. 'कॉमेडी सर्कस' हिंदी रिअॅलिटी शोमध्येही त्याने भाग घेतला आणि नुसता भाग नाही, तर तिथेही त्याने चाहता वर्ग निर्माण केला आहे. रोहित शेट्टीच्या 'गोलमाल'मध्येही त्याने सत्तू सुपारी या कॉन्ट्रॅक्ट किलरची भूमिका साकारली होती. छोटी आणि विनोदी भूमिका असूनही सिद्धार्थ त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.

 

 

'हसा चटक फू' आणि  'घडलंय बिघडलंय' या मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. आता सुरु असलेल्या 'गेला उडत' या नाटकामुळेही सिद्धार्थच्या फॅनफॉलोविंगमध्ये वाढ झाली आहे.

 


सिद्धार्थला मुंबई लाईव्हकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!हेही वाचा

नवाजुद्दीन सिद्दीकीला अखेर त्याची 'किंमत' कळली!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा