असामान्य कर्तृत्वाला अंशुमनचा सलाम; 'अकस' पुरस्काराची घोषणा

समाजात दडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या धाडसाचं किंवा कार्याचं यथोचित कौतुक आणि सत्कार व्हावा या उद्देशाने अंशुमनने 'अकस' अर्थात 'असामान्य कर्तृत्वाला सलाम' या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांतंर्गत समाजात दडलेल्या काही अशा घटकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, ज्यांनी सामान्य व्यक्तींपेक्षा एक पाऊल पुढे जात असामान्य कर्तृत्व गाजवलं आहे

SHARE

हरहुन्नरी अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत ओळख असलेला अभिनेता अंशुमन विचारे याने काही दिवसांपूर्वीच 'अंशुमन विचारे अॅक्टींग अॅकॅडमी'च्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत अभिनयाचा वारसा पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. आता एक पाऊल पुढे टाकत समाजात दडलेल्या असामान्य कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा अंशुमनने केली आहे.


अकस पुरस्कार

समाजात दडलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या धाडसाचं किंवा कार्याचं यथोचित कौतुक आणि सत्कार व्हावा या उद्देशाने अंशुमनने 'अकस' अर्थात 'असामान्य कर्तृत्वाला सलाम' या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांतंर्गत समाजात दडलेल्या काही अशा घटकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, ज्यांनी सामान्य व्यक्तींपेक्षा एक पाऊल पुढे जात असामान्य कर्तृत्व गाजवलं आहे. यासाठी एकूण सहा व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशा प्रकारचे पुरस्कार इतरांना चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देतीलच, पण त्यासोबतच कर्तृत्ववान व्यक्तींना पुढील कार्यासाठीही उर्जा प्रदान करतील.


सामाजिक उपक्रम 

नवोदितांना व्यावसायिक प्रशिक्षणासोबतच शंभर टक्के संधी उपलब्ध करून देणं या उद्देशासोबतच अंशुमनने अॅक्टींग अॅकॅडमीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत, सामाजिक उपक्रम राबवण्याचा महत्त्वपूर्ण उद्देशही समोर ठेवला आहे. आजवरच्या आपल्या जीवनात वृद्धांसोबतच अनाथ मुलांच्या जीवनाला आधार देण्याचं कार्य अंशुमनने अगदी बिनबोभाटपणे केलं आहे. 'अकस'च्या माध्यमातून तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा मानस आहे.


फेब्रुवारीत वितरण

याबाबत 'मुंबई लाइव्ह'ला माहिती देताना अंशुमन म्हणाला की, फेब्रुवारी महिन्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. यात कोणत्याही प्रतिथयश पुरस्कार प्राप्त उमेदवारांऐवजी ज्यांना यापूर्वी कधीही पुरस्कार देण्यात आलेला नाही अशा व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. 


नावं सुचवण्याचं आवाहन 

या पुरस्कारासाठी प्रत्येकाने आपापल्या संपर्कात असलेल्या असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींची नावं सुचवण्याचं आवाहन अंशुमनने 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून केलं आहे. १४ जानेवारी २०१९ ही निवेदन स्वीकारण्याची अंतिम तारीख असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचंही अंशुमन म्हणाला.


मोलाची साथ 

anshumanvichareactingacademy@gmail.com या संकेतस्थळावर किंवा लेखी पत्राद्वारे अंशुमन विचारे अॅक्टींग अॅकॅडमी, पुष्पकधाम सोसायटी, हिंदुस्थान बँकेच्या वर, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, बेतुरकर पाडा, कल्याण (प.)- ४२१३०१ या पत्त्यावर पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या नावांची सूचना व माहिती देण्याचं आवाहन अंशुमनने केलं आहे. ज्युरी मेंबर डाॅ. सोनाली लोहार, पुरस्कार समिती सदस्य राजेंद्र पवार, इव्हेन्ट हेड संतोषी पवार आणि दीपक गोडबोले यांची अंशुमनला या पुरस्काराच्या कामात मोलाची साथ लाभणार आहे.हेही वाचा - 

'शौर्य' आणि 'सेवे'ची अपूर्व भेट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या सेटवर आमटे दाम्पत्य

अर्शदला लागले वेब सिरीजचे वेध!
संबंधित विषय
ताज्या बातम्या