Advertisement

Video: कॅलिफोर्नियात अश्विनीचं “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक…”

कॅलिफोर्नियामध्ये भरलेल्या पमकिन फेस्टिव्हल म्हणजेच भोपळा महोत्सवाला अश्विनीने नुकतीच भेट दिली. तिथे तिने शूट केलेला एक छोटासा व्हिडिओ ‘मुंबई लाइव्ह’कडे आला आहे. भोपळ्यांच्या या विश्वात निरनिराळ्या प्रकाराचे, रंगांचे आणि आकाराचे भोपळे असल्याचं अश्विनी सांगते.

Video: कॅलिफोर्नियात अश्विनीचं “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक…”
SHARES

खरा कलाकार चंदेरी दुनियेपासून कितीही दूर गेला तरीही रूपेरी पडद्यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेबाबतही असंच म्हणता येईल. आपली कलेची हौस भागविण्यासाठी अधूनमधून भारतात येणारी अश्विनी सध्या भोपळ्यांच्या प्रेमात पडली आहे.


भोपळा महोत्सवाला भेट

कॅलिफोर्नियामध्ये भरलेल्या पमकिन फेस्टिव्हल म्हणजेच भोपळा महोत्सवाला अश्विनीने नुकतीच भेट दिली. तिथे तिने शूट केलेला एक छोटासा व्हिडिओ ‘मुंबई लाइव्ह’कडे आला आहे. भोपळ्यांच्या या विश्वात निरनिराळ्या प्रकाराचे, रंगांचे आणि आकाराचे भोपळे असल्याचं अश्विनी सांगते. इथलेच काही भोपळे सिलेक्ट करून ती आपल्या अमेरिकेतील घराबाहेर सजावटही करणार आहे.


पझलच्या भिंतीत फेरफटका

या महोत्सवात एक मेझ म्हणजे पेंढ्यांची भिंतही तयार करण्यात आली आहे. एखाद्या पझलप्रमाणे तयार करणाऱ्या या भिंतीत फेरफटका मारण्याचा मोह अश्विनीला आवरता आला नाही. या भिंतीमध्ये आपण स्वत:ला हरवून तर बसणार नाही ना असंही अश्विनी थट्टेनं म्हणाली. कारण या भिंतीचा शेवट किंवा दरवाजा तिला ठाऊक नव्हता.

हाफमून डेच्या दिवशी कॅलिफोर्नियामध्ये हा पमकिन फेस्टिव्हल भरवण्यात येतो. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या भोपळ्यांचा समावेश करण्यात येतो. हे भोपळे पाहून बालपणी शाळेत शिकवलेलं “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक…” हे गाणं अश्विनीला नक्कीच आठवलं असेल यात शंका नाही.



हेही वाचा-

अमेरिकेत अश्विनी भावेंनी फुलवली फळाफुलांची बाग!

राखी सावंतचा तनुश्री दत्तावर २५ पैशांचा मानहानीचा दावा

अनुपम खेर यांचा 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा