Advertisement

आलिया भट्टनं लाँच केलं स्वत:चं प्राॅडक्शन हाऊस

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं आता करिअरमध्ये एक पाऊल पुढं टाकलं आहे.

आलिया भट्टनं लाँच केलं स्वत:चं प्राॅडक्शन हाऊस
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं आता करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे. आलिया आता निर्मातादेखील बनली आहे. तिने मुंबईत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. याबाबतची माहिती आलियाने स्वत: तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे दिली आहे.

तिनं आपल्या प्रॉडक्शन कंपनीचे काही फोटो आणि पोस्टर शेअर केले आहेत. 'इटरनल सनशाईन' असे आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव असून कंपनीचा लोगो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आलियाच्या प्रॉडक्शन हाऊसचे ऑफिस मुंबईतील जुहू भागात आहे. आलियाच्या या ऑफिसची सजावट रूपिन सूचक यांनी केली आहे. रुपिननं २ जून २०२० रोजी आलियाच्या ऑफिसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आलियानं पोस्टर शेअर करुन लिहिलं की, 'मला प्रोडक्शन हाऊसची घोषणा करताना आनंद होतोय. चला आम्हाला काही कथा सांगू द्या, काही आनंदी, काही उबदार, काही सत्य कथा,' अशा आशयाचे कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिले आहे. आगामी काळात आलिया अभिनयासोबत चित्रपटांची निर्मिती करताना दिसणार आहे.

आलियाच्या पोस्टवर कमेंट करताना तिची आई सोनी राजदान यांनी लिहिलं की, "अभिनंदन, सुपर डुपर अभिमान." सोनी यांच्या व्यतिरिक्त करण जोहर, अपूर्व मेहता, रकुलप्रीत सिंग यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आलियानं २०१९ मध्ये ती लवकरच स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस सुरु करेल असं सांगितलं होतं. आलियानं शेअर केलेल्या लोगोमध्ये कंपनीच्या नावासोबत मांजरीचे कार्टून आहे. आलिया प्राणीप्रेमी असून तिला मांजरी आवडतात. म्हणून तिनं कंपनीच्या लोगोमध्ये मांजरीचे कार्टुन वापरले आहे.हेही वाचा

कंगना रणौत विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मार्च महिना नवीन मालिकांचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा