Advertisement

'द फॅमिली मॅन २' वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात देखील श्रीकांत तिवारी म्हणजे मनोज वाजपेयी याचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. तर कथाही जबरदस्त असणार आहे...

'द फॅमिली मॅन २' वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

ॲमेझॉनवरील 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता ॲमेझॉनवरील द फॅमिली मॅन ही वेबसिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजला प्राईम व्हिडिओ तर्फे हिरवा झेंडा मिळाला आहे

कुटुंब की देशाची जबाबदारी?

'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजच्या दुसऱ्या भागात देखील श्रीकांत तिवारी म्हणजे मनोज वाजपेयी याचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. पहिल्या सिजनप्रमाणे दुसऱ्या सिजनमध्ये देखील ॲक्शन आणि सस्पेन्सचा तडका असणार आहे. दुसऱ्या भागात श्रीकांत तिवारी कुटुंब आणि आणि देशाची जबाबदारी यामध्ये तारेवरची कसरत करताना दिसेल.

साऊथ इंडियन सुपरस्टारची एन्ट्री

'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये साउथ इंडियन सुपरस्टार समँथा अक्किनेनी डिजिटल क्षेत्रात पदार्पण करत आहे. समँथा अक्कीनेनी साउथ इंडियन चित्रपटात तिच्या अभिनय आणि मनमोहक अदांसाठी प्रसिद्ध आहे. समँथासोबत, मनोज वाजपेयी, शारिब हाशमी, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदूजा, श्रेया धनवंतरी, शादाब अली, वेदांत सिन्‍हा आणि मेहक ठाकुर हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.

नव्या सिरीजची उत्कंठा

डि टू आर फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीच्या माध्यमातून याची निर्मिती झाली आहे.  राज आणि डिके यांच्यासोबत सुमन कुमार यांनी या सिरीजची स्टोरी लिहली आहे. या वेबसिरीजचा पहिला सिजन समीक्षकांसोबतच प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरला. वेबसिरीजमध्ये फॅमेली ड्रामा, अॅक्शन, थ्रिलर, सस्पेन्स या सर्व गोष्टीं समाविष्ट होत्या. एका सिरीजमध्ये एवढ्या गोष्टी मिळाल्यानंतर बेवसिरीज प्रेक्षकांच्या का नाही पसंतीस उतरणार. कलाकारांच्या अभिनयानं आणि श्रीकांत तिवारीच्या भुमिकेमुळे प्रेक्षकांची स्टोरी बद्दलची उत्कंठा अधिक वाढवली आहे.

"स्पाय स्टोरीजना डिमांड"

अॅमेझॉन इंडियाचे डायरेक्टर विजय सुब्रम्हण्य यांनी सांगितलं की, आमच्या आंतरराष्ट्रीय ओरीजनल सिरीजमध्ये स्पाय स्टोरींना जास्त मागणी आहे. प्रेक्षकांकडून अशा वेबसिरीज अधिक पसंत केल्या जातात. भारतातून 'द फॅमेली मॅन' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरत आहे आणि आम्हाला याचा आनंद आहे. फक्त भारतातच नाही परदेशी देखील या वेबसिरीजला डिमांड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही 'द फॅमेली मॅन' या वेबसिरीजला घेऊन पुन्हा येत आहोत. या नव्या सिजनसाठी आम्ही फार उत्सुक आहोत.

"पहिल्यापेक्षा अधिक थ्रील"

डी टू आर फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनी मार्फत 'द फॅमेली मॅन' २ ची निर्मिती करणारे राज आणि डिके म्हणाले की, द फॅमेली मॅन या वेबसिरीजनं जगात धमाका केला आहे. आम्हाला आनंद आहे की, प्रेक्षकांनी या सिरीजसोबत स्वत:ला कनेक्ट केलं. प्रदर्शित होण्याच्या काही दिवसांनंतरच वेबसिरीजला मिळालेल्या प्रेमासाठी आम्ही फार आनंदी आहोत. आम्ही एक नवीन सिजन घेऊन पुन्हा येतोय. नवीन सिजनमध्ये पहिल्यापेक्षा अधिक थ्रिल आणि सस्पेन्स असेल.

"दुसऱ्या सिजनसाठी उत्सुक"

मनोज वाजपेयी म्हणाला की, एका अभिनेत्यासाठी याहून चांगला अनुभव दुसरा कुठलाच असू शकत नाही. 'द फॅमेली मॅन' या वेबसिरीजमध्ये आमच्या अभिनयाला ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्या खूप काही बोलून जातात. राज आणि डिके आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचा मी खूप आभारी आहे की, त्यांनी माझावर विश्वास ठेवला आणि मला श्रीकांत तिवारी ही भूमिका करण्याची संधी दिली. आता तर याचा दुसरा सिजन येतोय. मी खूप खूश आहे.


हेही वाचा

प्रियंका-निकच्या आयुष्यात आला एक छोटा नवा पाहुणा

द पावर ऑफ 'कमांडो ३'

संबंधित विषय
Advertisement