Advertisement

ट्विटरवर अमिताभ बच्चन बनले ‘मोस्ट ट्रेंडिंग स्टार’

अमेरिकेतील स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे. चित्रपटांसोबतच जाहिराती, सामाजिक, राजकीय आणि इतर ज्वलंत मुद्द्यांच्या माध्यमातूनही अमिताभ चाहत्यांशी संवाद साधत नेहमी टचमध्ये असतात.

ट्विटरवर अमिताभ बच्चन बनले ‘मोस्ट ट्रेंडिंग स्टार’
SHARES

अभिनेते अमिताभ बच्चन हे २०१७-१८ या वर्षातील ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत असलेले लोकप्रिय आणि ट्रेंडिग बॉलीवूडस्टार बनले आहेत. स्कोर ट्रेंड्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ मध्ये बाकी बॉलीवूड ताऱ्यांपेक्षा शहेनशाह अमिताभ बच्चन हेच जास्त लोकप्रिय असल्याचं आढळून आलं आहे.


शाहरूख दुसऱ्या स्थानावर 

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वार्षिक सर्व्हेनुसार, मागील ५२ आठवड्यांमध्ये ट्विटरवर लोकप्रियतेत अमिताभ पहिल्या तर, शाहरूख खान दुसऱ्या, सलमान खान तिसऱ्या, अक्षय कुमार चौथ्या आणि ऋतिक रोशन पाचव्या स्थानावर होते. अमेरिकेतील स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे. चित्रपटांसोबतच जाहिराती, सामाजिक, राजकीय आणि इतर ज्वलंत मुद्द्यांच्या माध्यमातूनही अमिताभ  चाहत्यांशी संवाद साधत नेहमी टचमध्ये असतात. यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.


लोकप्रियतेतही सवाई

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांच्या म्हणण्यानुसार, ट्विटरवर अमिताभ यांना अद्भुत चाहतावर्ग लाभला आहे. एवढी लोकप्रियता इतर कोणत्याही भारतीय अभिनेत्याला मिळालेली नाही. बिग बी खरोखरच फक्त अभिनयातच नाही, तर लोकप्रियतेतही इतर अभिनेत्यांपेक्षा सवाई आहेत. १४ भारतीय भाषांमधल्या ५०० हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहिलेल्या बातम्यांच्या माध्यमातून तारे-तारकांची लोकप्रियता समजते. गेल्या काही दिवसांमध्ये डिजीटल विश्वात अमिताभ यांच्या मुलाखती, व्हिडीओ, लेख आणि बातम्यांचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे.हेही वाचा -

एआयबीला तन्मय भट, गुरसिमरनची सोडचिठ्ठी!

कॉमेडिअन कपिल शर्माचं लवकरच पुनरागमन 

संबंधित विषय
Advertisement