Advertisement

अमिताभ बच्चन यांच्यावर नेटिझन्स संतापले, सोनू सूदकडून शिकण्याचा दिला सल्ला

कोरोनाव्हायरसशी लढा देऊन घरी परतलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना सोशल मीडियावर रोषाला सामोरं जावं लागतं आहे.

अमिताभ बच्चन यांच्यावर नेटिझन्स संतापले, सोनू सूदकडून शिकण्याचा दिला सल्ला
SHARES

कोरोनाव्हायरसशी लढा देऊन घरी परतलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना सोशल मीडियावर रोषाला सामोरं जावं लागतं आहे. अमिताभ यांनी कोरोनावर मात केल्यानंतर कोरोनाच्या या परिस्थितीतही कोट्यवधींची कार घेतली. त्यामुळे नेटिझन्स त्यांच्यावर भडकले आहेत.

अमिताभ यांनी S Class मर्सिडीज कार खरेदी केली आहे. नुकतीच ही कार भारतात लाँच झाली आणि अमिताभ यांनी लगेच ती खरेदीही केली. इंटरनेटवरील माहितीनुसार या कारची किंमत जवळपास १ कोटी ३८ लाख रुपये आहे. या कारचं रजिस्ट्रेशन अमिताभ बच्चन यांच्या नावानं आहे. विरल भयानीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचे फोटो टाकण्यात आले आहेत. हे फोटो पाहताच अमिताभ यांना नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे.

अमिताभ यांची ही कार पाहताच ते सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. नेटिझन्सनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. एकिकडे सोनू सूद कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करतोय.

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन कोट्यवधींची कार खरेदी करत आहेत. अमिताभ यांनी सोनू सूदकडून काहीतरी शिकावं. इतका पैसा गाडीवर खर्च करण्यापेक्षा लोकांना दान करावं. त्यांची मदत करावी. अशा संतप्त प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत.

अमिताभ यांच्याकडे आधीपासूनच अनेक मोठ्या कार आहेत. रोल्स रॉयज ,मर्सिडीज-बेंज एस-क्लास S500, ऑडी A8L, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी यासारख्या महागड्या कारचा यात समावेश आहे. त्यांच्या या कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झाला आहे. या कारचा नंबरही खास आहे.

अमिताभ यांच्या या नव्या कारचा नंबर MH02FJ4041 आहे. यातील आकड्यांची बेरीज केल्यास एकूण ११ होते. अमिताभ हा आकडा आपल्यासाठी लकी मानतात. तसंच ११ ऑक्टोबर ही त्यांची जन्म तारीख आहे.



हेही वाचा

सुबोध भावेनंतर हे मराठी कलाकार कोरोनाच्या विळख्यात, शोचं चित्रिकरण थांबवलं

'आपला मराठी बिग बॉस' तिसरा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा