Advertisement

‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता!

खरं तर ‘आईच्यान रं…’ हे पूर्ण गाणं अभिनय आणि कश्मिरा या जोडीवर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात ‘रंपाट’च्या नायक-नायिकेचा ड्रीम सिक्वेन्सही आहे. या ड्रीम सिक्वेन्समध्ये सुरुवातीला अंकुश-अमृता या जोडीचा परफार्मंस पाहायला मिळतो.

‘आईच्यान रं…’ म्हणत एकत्र आले अंकुश-अमृता!
SHARES

‘नटरंग’, ‘टाइमपास’, ‘बालक पालक’ यांसारखे एका पेक्षा एक चित्रपट बनवत रसिकांचं मनोरंजन करणारा दिग्दर्शक रवी जाधव मागील बऱ्याच दिवसांपासून ‘रंपाट’ या चित्रपटाच्या कामात मग्न आहे. या चित्रपटात एका नव्या कोऱ्या जोडीसोबतच प्रेक्षकांना अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर या जोडीची केमिस्ट्रीही अनुभवायला मिळणार आहे.


गाणं रिलीज

‘रंपाट’च्या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून, एका मागोमाग एक रवी या चित्रपटातील रहस्यांवरून पडदा उठवत आहे. रवीनं सुरुवातीला या चित्रपटात अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत असल्याचं सांगणारा फर्स्ट लुक रिलीज केला. त्यानंतर त्यानं अभिनयची नायिका कश्मिरा परदेशीला सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच केलं. आता रवीनं या चित्रपटातील ‘आईच्यान रं…’ हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यात अंकुश-अमृता ही जोडीही आहे.

 

 गुपित उघड नाही

खरं तर ‘आईच्यान रं…’ हे पूर्ण गाणं अभिनय आणि कश्मिरा या जोडीवर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यात ‘रंपाट’च्या नायक-नायिकेचा ड्रीम सिक्वेन्सही आहे. या ड्रीम सिक्वेन्समध्ये सुरुवातीला अंकुश-अमृता या जोडीचा परफाॅर्मंस पाहायला मिळतो. नंतर अभिनय-अमृता आणि कश्मिरा-अंकुश या जोड्यांचे डान्सेसही दिसतात. अंकुश-अमृता ही जोडी संपूर्ण चित्रपटात झळकणार की, केवळ ‘आईच्यान रं…’ या गाण्यापुरतीच आहे हे गुपित अद्याप उघड केलेलं नाही. असं असलं तरी चंदेरी दुनियेतील अंकुश-अमृता ही जोडी ‘रंपाट’मधील स्टार जोडी असल्याचे संकेत मात्र मिळतात.


१७ मे रोजी प्रदर्शित

‘मनात तुफान आणि डोळ्यात सपान घेऊन आलंय 'रंपाट'चं पहिलं गाणं ‘आईच्यान रं…!’ असं लिहित रवीनं या गाण्याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्याच्या सुरुवातीला एकीकडं रंगीबेरंगी रिबीन्सनं सजवलेल्या सायकलवरून जाणाऱ्या अभिनयवर फिदा झालेल्या तरुणी दिसतात, तर दुसरीकडं बजरंगबलीकडं साकडं घालणारी कश्मिरा दिसते. ‘अ जर्नी आफ अचिव्हींग युवर ड्रीम’ अशी टॅगलाईनही या गाण्यासोबत आहे. चिनार-महेश या संगीतकार जोडीनं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. झी स्टुडिओज आणि मेघना जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

लिंक - http://bit.ly/AaichaanRa हेही वाचा -

‘भारत’साठी ‘पिकला’ सलमान!

७ वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णींचं अभिनयात पुनरागमन!
संबंधित विषय