Advertisement

अर्धवटरावांची नाबाद शंभरी !


अर्धवटरावांची नाबाद शंभरी !
SHARES

दादर - अर्धवटराव आणि आवडाबाई आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाचे असतीलच. असायलाच पाहिजेत. कारण चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हेच अर्धवट आता 100 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा वाढदिवस बुधवारी दादरमधील कोहिनूर हॉलमध्ये रामदास पाध्ये कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला.

शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे वडील प्रा. वाय. के. पाध्ये हे प्रसिद्ध जादूगार होते. शब्दभ्रमाचा खेळ करण्यासाठी १९१६ साली त्यांनी इंग्लंडहून आणलेल्या कळसूत्रीचे भारतीयीकरण करून मध्यमवर्गीय इरसाल कुटुंबीय जन्माला घातले. हेच ते अर्धवटराव आणि आवडाबाई. बघता बघता ही जोडी घरोघरी प्रसिद्ध झाली.
रामदास पाध्ये गेली ४९ वर्षे वडीलांच्या या कलेचा वारसा पुढे नेत आहेत. पुढच्या पिढीला अर्धवटरावाची माहिती व्हावी याकरिता ‘कॅरी ऑन एंटरटेन्मेंट-रामदास पाध्ये लाइव्ह’ या कार्यक्रमातून अर्धवटराव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पाध्ये यांचे संपूर्ण कुटुंब मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रेक्षकांनी कधीही न अनुभवलेले शब्दभ्रमाचे खेळ या अनोख्या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहेत. तसेच या विशेष कार्यक्रमाचे आयोजन देशात तसेच परदेशात करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement