Advertisement

‘ड्राय डे’ च्या कलाकारांनी दिला ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह’ संदेश


‘ड्राय डे’ च्या कलाकारांनी दिला ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह’  संदेश
SHARES

 दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेत आता रुपेरी पडद्यावरील कलाकारही सामील झाले आहेत. ‘ड्राय डे’ या आगामी मराठी सिनेमातील कलाकारांनी रस्त्यावर उतरून वाहनचालकांना ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह’ चा संदेश दिला.


गुलाबाची फुलं देऊन संदेश 

वर्षारंभाच्या सप्ताहात दारू पिऊन गाडी चालवण्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे ‘दारू पिऊन वाहने चालवू नका’ या मोहिमेअंतर्गत अनेक संस्था पोलिसांना सहाय्य करत असतात. केवळ ३१ डिसेंबरच्या सप्ताहातच नव्हे, तर ‘कधीच दारू पिऊन वाहनं चालवू नका’ असा समाजहिताय संदेश ‘ड्राय डे’ सिनेमाच्या संपूर्ण टीमने नागरिकांना दिला.

ठाणे येथील तीन हात नाका येथे राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये ‘ड्राय डे’ या सिनेमातील ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलाश वाघमारे, मोनालिसा बागल आणि आयली घिए या कलाकारांनी वाहतूक पोलिसांसोबत  ‘डोन्ट ड्रिंक अँड ड्राइव्ह’ संदेश असलेली ग्रिटींग्स आणि गुलाबाची फुलं वाहनचालकांना वाटली. तसंच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना शुभेच्छापत्रदेखील दिली. 


१३ जुलैला प्रदर्शित 

दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे जीवितहानी होण्याची अधिक शक्यता असल्याने वाहन चालवताना ‘ड्राय डे’ पाळा, असा गोड उपदेश सिनेमाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी  दिला आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित तसंच नितीन दीक्षित संवाद व पटकथा लिखित ‘ड्राय डे’ या सिनेमामध्ये आजच्या तरुण पिढीचं भावविश्व रेखाटण्यात आलं आहे.



हेही वाचा - 

शर्मिष्ठा, मेघाला ‘बिग बॅास’मध्ये होणार शिक्षा!

अक्षयची प्रस्तुती असलेल्या ‘चुंबक’ चं पहिलं पोस्टर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा