Advertisement

बिग बॉस मराठी : विनीत भोंडेला मिळाली शिक्षा!


बिग बॉस मराठी : विनीत भोंडेला मिळाली शिक्षा!
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरात विनीत भोंडे हा बऱ्याच वेळा चर्चेचा विषय असतो. मग त्याचे जोरजोरात बोलणे असो वा त्याचे चिडणे असो. बिग बॉसच्या घरामध्ये नियमांना खूप महत्व असते. घरातील कुठलाही सदस्य बिग बॉसने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही आणि असे केल्यास त्याला शिक्षा देण्यात येते. असंच काहीसं विनीत भोंडेबद्दल झालं आहे.



बिग बॉस मला माफ करा!

पहिल्या दिवसापासून विनीत भोंडेला त्याचा माईक विसरण्याची सवय आहे. इतकेच नव्हे, तर कॅप्टन्सीच्या दरम्यान देखील त्याची ही सवय गेली नाही. याच कारणामुळे तो आता बिग बॉसच्या शिक्षेसाठी पात्र ठरणार आहे. विनीतच्या या बेजबाबदार स्वभावावर घरतल्या इतर मंडळींनी देखील बऱ्याचदा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या आदेशानुसार विनीत भोंडेला गार्डन एरियामध्ये बसून 'बिग बॉस मला माफ करा' असे पाटीवर लिहीत राहायचे आहे. तेही बिग बॉसचा पुढचा आदेश मिळेपर्यंत!


अास्तादला ही शिक्षा

विनीतच्या या स्वभावामुळे घराच्या कॅप्टनलाही नाहक त्रास सहन कारावा लागणार आहे. घराचा या आठवड्याचा कॅप्टन आस्ताद काळेलाही बिग बॉस शिक्षा देणार का? की दुसरा कोणता टास्क अास्तादला करावा लागणार? याचा मात्र अंदाज लागेनासा झालाय!



हेही वाचा

बिग बॉसच्या घरात कोण ठरणार खुर्ची सम्राट?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा