Advertisement

शब्दांचा जादुगार 'गुलजार'


शब्दांचा जादुगार 'गुलजार'
SHARES

हवा के सींग ना पकडो खदेड देती है, जमीं से पेडों के टांके उधेड देती है... शब्दांची ही जादुगिरी फक्त गुलजारच करू शकतात. शब्दांच्या याच जादुगाराचा आज वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आणि शब्दमैफिलीच्या दुनियेत गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये गुलजार प्रेक्षकांसमोर आले आहेत.

गुलजार यांचे मूळ नाव संपूर्णसिंह कालरा असे आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 मध्ये झाला. पंजाबमधल्या दीना (सध्याचे पाकिस्तान) इथे त्यांचा जन्म झाला. फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतातील अमृतसरमध्ये राहायला आले. त्यानंतर गुलजार मुंबईतील वरळी इथल्या एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करू लागले. लहानपणापासून गुलजार यांना कविता लिहायला आवडत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून फावल्या वेळात केलेल्या कविता गुलजार त्यांना ऐकवत. गुलजार यांनी बंदिनी चित्रपटासाठी पहिल्यांदा 'मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे' हे गाणे लिहिले. बिमल रॉय यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरू केल्यापासून गुलजार यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला. 

 

गुलजार यांच्या जीवनातील वैशिष्ट्ये    

  1.  गुलजार कॉलेज जीवनापासूनच पांढरे कपडे घालतात
  2.  गुलजार यांच्या सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक पाहायला मिळतो. कारण भूतकाळ दाखवल्याशिवाय सिनेमा पूर्ण होत नाही, असे गुलजार यांचे मत आहे
  3. गुलजार यांना उर्दू लिहिणे आवडते
  4. 'कोशिश' हा सिनेमा मूक बधीर विषयावर आधारीत असल्याने गुलजार या सिनेमासाठी साइन लँग्वेज शिकले
  5. गुड्डी सिनेमासाठी त्यांनी लिहिलेले 'हमको मन की शक्ती देना' हे गाणे एवढे हिट झाले की ते शाळांमध्ये प्रार्थना म्हणून गायले जाऊ लागले
  6. गुलजार यांना टेनिस खेळणे पसंत आहे. रोज सकाळी ते टेनिस खेळतात
  7. अभिनेत्री मीना कुमारी यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती

इतक्या वर्षानंतरही गुलजार यांची गाणी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात

मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी गुलजार यांच्या गाण्यांचा नजराणा...

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है (इज्जत)

छोटी सी कहानी से (इज्जत)

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही ( आंधी)

दो दिवाने शहर में (घरोंदा)

तुझ से नाराज नही जिंदगी (मासूम)

मेने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने (आनंद)

जय हो (स्लम डॉग मिलेनियर)

शाम से आख में नमी सी है (अल्बम)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा