Advertisement

कंगनाचं कार्यालय बीएमसीने तोडलं

कंगना रणौतचे वांद्रे येथील कार्यालय तोडण्याची कारवाई मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.

कंगनाचं कार्यालय बीएमसीने तोडलं
SHARES

कंगना रणौतचे वांद्रे येथील कार्यालय तोडण्याची कारवाई मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.

 कंगना मुंबईत दाखल होत आहे. त्यासाठी ती हिमाचल येथून निघाली आहे. कंगनाला देखील कारवाईची माहिती मिळाली आहे. कंगनाच्या वकिलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती. पण बीएमसीने ही मागणी फेटाळली आहे.

कंगनाने ट्विट करत म्हटलं की, 'माझ्या येण्याच्या आधीच महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंडे माझ्या ऑफिसच्या बाहेर पोहोचले आहे. आणि ऑफिस तोडण्याची तयारी करत आहेत. कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे.



हेही वाचा -

कोरोनाच्या काळात मुंबईतल्या मेट्रोचे काम वेगानं सुरू

रिया चक्रवर्तीला भायखळा कारागृहात हलवले



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा