SHARE

शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी': द अनसंग वॉरियर' (Tanhaji) हा सिनेमा महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ (tax free) करण्यात आला आहे. यानंतर या सिनेमाचा निर्माता आणि सिनेमात तान्हाजीची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगण याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (cm uddhav thackeray) आभार मानले आहेत.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (state cabinet meeting) तान्हाजीला टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष सिनेमा प्रदर्शित होऊन तब्बल १२ दिवस उलटून गेल्यावर तो टॅक्स फ्री करण्यात आला आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्रातही 'तान्हाजी' करमुक्त

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या (tanaji malusare) कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी' चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर साकारण्यात आली आहे. 'तान्हाजी' सिनेमा २०२० मध्ये १०० कोटींचा टप्पा गाठणारा पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमात अजय देवगण सोबतच सैफ अली खान, काजोल, शरद केळकर आणि अजिंक्य देव आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. 

या आधी उत्तर प्रदेश, हरयाणा सरकारने हा सिनेमा टॅक्स फ्री केल्यावर महाराष्ट्रातही हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'तान्हाजी' सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला. त्यानुसार कुठल्याही सिनेमागृहात या सिनेमाच्या तिकीटावर प्रेक्षाकांकडून राज्य वस्तू व सेवा कर (gst) वसूल करण्यात येणार नाही.

हेही वाचा- 'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई

महाराष्ट्रात तान्हाजी टॅक्स फ्री होताच, अजय देवगणने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले. यापूर्वीही अजय देवगणने (ajay devgn) हरयाणा आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. 

दरम्यान मुंबईतील प्लाझा या सिनेमागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजय देवगण हे दोघे तान्हाजी हा सिनेमा बघणार होते. परंतु नंतर त्यांनी मी माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत हा सिनेमा बघेन असं त्यांनी सांगितलं. 

तर, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही नुकताच तान्हाजी हा सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर छगन भुजबळ यांनी तान्हाजीच्या पोस्टरपुढे उभं राहून सेल्फीही काढला.  


संबंधित विषय
ताज्या बातम्या