Advertisement

महाराष्ट्रातही 'तान्हाजी' करमुक्त

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त (tax free) करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातही 'तान्हाजी' करमुक्त
SHARES

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त (tax free) करण्यात आला आहे. अभिनेता शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी' हा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावा अशी मागणी केली जात होती. या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. 

तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) १० जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आतापर्यंत १८० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. १३० कोटींच्या बजेटचा हा चित्रपट २०० कोटींहून अधिक व्यवसाय करेल. तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी करणारं पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister URevenue Minister Balasaheb Thoratddhav Thackeray) यांना दिलं होतं.

या पत्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं की, तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) हे एक वीर योद्धा. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सया चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत.
 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याबद्दल एकमत झाल्याची माहिती गेल्या आठवड्यात ट्विट करुन दिली होती. करमणूक करही आता जीएसटीच्या अखत्यारित येत असल्याने राज्य सरकार एसजीएसटीचा परतावा देणार आहे. मुख्यमंत्री लवकरच तशी घोषणा करतील, असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले होते.

  • उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणा (Haryana) पाठोपाठ आता महाराष्ट्रात (Maharashtra) ही तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट करमुक्त 
  • तान्हाजीः द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) १० जानेवारीला देशभरात प्रदर्शित झाला.
  • या चित्रपटात अजय देवगण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत सैफ अली खान आणि काजोलही मुख्य भूमिकेत आहेत. 




हेही वाचा - 


जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', तुम्हाला कळाला का?

'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित






Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा