Advertisement

जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', तुम्हाला कळाला का?

जितेंद्र जोशीचा चोरीचा मामला तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्की वाचा... काय आहे हे प्रकरण?

जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', तुम्हाला कळाला का?
SHARES

प्रियदर्शन जाधवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. यांच्यासोबत आणखी एक क्युट भूमिका साकारणारा कुत्रा देखील पाहायला मिळणार आहे. त्याचं नाव लियो दाखवलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियदर्शननं चित्रपटाचं पोस्टर इंन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. एकामागे एक आले किती चोर, गॅरंटी देणार, तुम्ही होणार नाही बोअर, हे कॅप्शन तिनं दिलं होतं. जितेंद्र जोशीनं या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. जगात चांगुलपणा शिल्लक आहे… आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला.. आवडून घ्या आणि सगळ्यांबरोबर वाटा, असं कॅप्शन या फोटोवर त्यानं दिलं आहे. अमृता खानविलकरनं देखील हेच कॅप्शन देत ट्रेलर शेअर केला आहे.


View this post on Instagram

https://youtu.be/FFX5vzx6SLs जगात चांगुलपणा शिल्लक आहे... आमचा चोरीला गेलेला ट्रेलर परत मिळाला.. आवडून घ्या आणि सगळ्यांबरोबर वाटा Watch Trailer: Link In Bio #ChorichaMamla Trailer Out Now #31stJan2020 #चोरीचामामला @chorichamamlafilm Written & Directed By : @priyadarshanjadhavv Produced By : @swaroop_recreationmediapvtltd @jitendrajoshi27 | @amrutakhanvilkar | @hemantdhome21 | @kirtimehendale | @aniketvishwasrao | @KshiteeJog | @aakashpendharkar | @mandar.pimple | @Darshanmediaplanet | @everestentertainment | @sachin_narkar_swaroop | @VikasPawar0310 | @chorichamamlafilm | @vizualjunkies

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27) on


एका चोरीमुळे होणारी गुंतागुंत, त्यानंतर घडणारे प्रसंग अतिशय मनोरंजक पद्धतीनं रंगवण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लियो नावाच्या कुत्र्याला जितेंद्र जोशी चोरतो, असं दाखवलं आहे. त्यानंतर होणारा गोंधळ मजेशीर रित्या मांडण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्हाला पोट धरून हसायला लावेल हे ट्रेलर पाहून जाणवतं. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित

'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा