Advertisement

अमजद अली खान, आशा भोसले यांना मंगेशकर पुरस्कार

ज्येष्ठ सरोज वादक अमजद अली खान यांना यंदाचा मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि 'हृदयेश अार्ट'तर्फे दरवर्षी या पुरस्काराचं वितरण करण्यात येतं. त्याचसोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अमजद अली खान, आशा भोसले यांना मंगेशकर पुरस्कार
SHARES

ख्यातकीर्त सरोज वादक अमजद अली खान यांना यंदाचा मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि 'हृदयेश अार्ट'तर्फे दरवर्षी या पुरस्काराचं वितरण करण्यात येतं. त्याचसोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.



आणखी कुणाला पुरस्कार?

सिनेसृष्टीतील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, तर उद्योगक्षेत्रातील कामगिरीसाठी धनंजय दातार यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.



पत्रकारितेतील योगदानासाठी जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना तसंच साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी कवी योगेश गौर आणि नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी शेखर सेन यांना गौरवण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट नाटकासाठी देण्यात येणारा मोहन वाघ पुरस्कार 'अनन्या' या नाटकाला जाहीर झाला आहे.



हेही वाचा-

विजय चव्हाण, म़णाल कुलकर्णी यांना व्ही.शांताराम पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित; 'या' मराठी चित्रपटानं मारली बाजी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा