Advertisement

हात थरथरत असले तरी मन तरुण- प्रकाश भेंडे

दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे जीवनावर आधारीत असलेल्या ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या पुस्तकाचं नुकतच प्रकाशन करण्यात आलं.

हात थरथरत असले तरी मन तरुण- प्रकाश भेंडे
SHARES

आज जरी वयाची सत्तरी ओलांडली असली तरी कुंचला हाती घेताच ५ ते १० मिनिटांमध्ये चित्र पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे. हात थरथरत असले तरी मन तरुण आहे. ही शक्ती पत्नी उमामुळे लाभल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार प्रकाश भेंडे यांनी व्यक्त केली.


पुस्तकाचं प्रकाशन

दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी, जयश्री टी., वर्षा उसगांवकर, मृणाल कुलकर्णी, हेमांगी राव, अभिनेता रमेश भाटकर, निर्माती-दिग्दर्शिका कांचन अधिकारी, संजीव पालांडे, आशुतोष घोरपडे, संपूर्ण भेंडे कुटुंबिय इ. उपस्थित होते. या प्रसंगी प्रकाश भेंडे यांनी स्वत: रेखाटलेली पुष्पचित्रे देऊन उपस्थितांचं स्वागत केलं.


उत्तम अभिनेत्री अन् माणूस

एक उत्तम अभिनेत्री म्हणून उमा या संपूर्ण जगाला ठाऊक आहेतच, पण माणूसही त्या कशा चांगल्या होत्या ते मान्यवरांच्या आठवणींमधून उलगडत गेलं. उमा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ५० हून अधिक मराठी सिनेमांसोबत ‘दोस्ती’, ’मासूम’सारख्या हिंदी, तेलगु आणि छत्तीसगडी सिनेमांमधून भूमिका साकारल्या आहेत.


सदाबहार आठवणी 

या सोहळ्यात भेंडे यांनी उमा यांच्यासोबतच्या आठवणी दिलखुलासपणे सांगितल्या. भेंडे यांच्या आग्रहाखातर उमा यांनी काही वर्षांनी ‘श्रीप्रसाद चित्र’ नावाची स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करून ‘भालू’सारखा सुपरहिट सिनेमा बनवला. चित्रपट खूप गाजला. परंतु, त्याच्या निर्मिती प्रक्रियेवेळी अनेक प्रस्थापित सिनेकर्मींकडून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात अनेक बरे-वाईट प्रसंग आले, ते जसेच्या तसे पुस्तकात लिहिल्याने बरेच जण सुखावतील, तर काहीजण दुखावण्याची शक्यताही भेंडे यांनी वर्तवली.



हेही वाचा-

…आणि चिन्मयने रचला इतिहास! एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित

लेखक लेक मृणालवर भारी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा